पुनश्च ऑल इंडिया पॅंथर सेना बीड जिल्हा अध्यक्षपदी नितीन सोनवणे यांची फेरनिवड.
- पुनश्च ऑल इंडिया पॅंथर सेना बीड जिल्हा अध्यक्षपदी नितीन सोनवणे यांची फेरनिवड.
- बीड प्रतिनिधी : ऑल इंडिया पॅंथर सेना नव्याने संघटन बांधणी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाई केदार यांच्या आदेशाने महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, यांनी बीड व महाराष्ट्र मधील सर्व जिल्हे व तालुका कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती.त्याच अनुषंगाने आज रोजी बीड जिल्हाध्यक्षपदी नितीन सोनवणे यांच्या कार्याची दखल घेऊन. नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. वंचित,उपेक्षित,अल्पसंख्याक, आदिवासी, बहुजन ,दिन दुबळ्याच्या अन्यायाला अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ऑल इंडिया पॅंथर सेना महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून काम करत आहे.
- संघटनात्मक बांधणीचा भाग म्हणून आज बीड जिल्हा अध्यक्षपदी नितीन सोनवणे यांची निवड केली. त्यांना नियुक्तीपत्र देऊन सामान्य जनतेच्या हिताचे काम करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.तसेच जिल्हाध्यक्ष यांचे हस्ते बीड जिल्ह्यामधील सर्व तालुका व शहर कार्यकारणी नियुक्ती करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. या निवडीचे बीड जिल्ह्यातुन सर्व स्तरातून तालुक्यामधून नितीन सोनवणे यांचे अभिनंदन होत आहे.
error: Content is protected !!