फुले, शाहू आंबेडकरांनी गाडलेला मनुवाद आज पुन्हा जिवंत होतोय त्याच नाव आधुनिक मनु ईव्हीएम होय!:- दिपक भाई केदार.
- फुले, शाहू आंबेडकरांनी गाडलेला मनुवाद आज पुन्हा जिवंत होतोय त्याच नाव आधुनिक मनु ईव्हीएम होय!:- दिपक भाई केदार.
- पुणे प्रतिनिधी : राज्यात प्रस्तापित तीन पक्षाच्या विरोधात ताकतीने लढण्याची धमक कुणी दाखवत नव्हतं. यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने तिसरी आघाडी निर्माण करून पर्याय दिला. नवे पक्ष उभा राहत आहेत, कामगार, शेतकरी, दलित, विकासाच्या मुद्द्यावर मोठी भूमिका मांडून प्रस्तापित, कुटुंबशाहीला सुरुंग लावत असल्याचे चित्र दिसल्यामुळे त्यांनी प्रस्तापित भाऊ भाऊ एकत्र येऊन भाजपाच्या बी टीमची भूमिका घेतली.
- छत्रपती संभाजीराजे समतेच राज्य आणू पाहत आहेत. समतेला विरोध करणारे हे सगळे एक झाले. हॅकिंग सरकार आणून त्यांनी आधुनिक मनु जिवन्त केला आहे.
- काहीही असले तरी छत्रपती संभाजीराजेंनी प्रस्तपितांच्या व्यवस्थेला विस्तापित पर्याय दिला. लढाऊ आंदोलकांना राजकीय अस्तित्व दिलं.
- पुढील लढाईसाठी आपण सज्ज झालं पाहिजे. विस्तपीतांची चळवळ गतिमान करू. शाहू महाराजांना ज्यांनी विरोध केला तेच आज आपल्याला राजकीय अस्पृश्य करू पाहत आहेत.
- राज्यभर आपण जी भूमिका निवडणुकीच्या काळात मांडली तिला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला.
- शिवसेना संपूर्णपणे संपलेली आहे, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळेच लोकांनी नाकारले आहेत. या निवडणुकीत नेता, चिन्ह, पक्ष लोकांनी नाकारले. पैशाला आणि योजनेला मतदान झाले आणि हॅकिंगचा सुद्धा वापर झाला.
- आता हा मोठा गॅप आपल्याला भरून काढण्याची संधी आहे. आपण निवडणुकी पुरतं मर्यादित न राहता पुढेही एकत्र येऊन समूहाच्या मूलभूत हक्कासाठी लढावं लागेल.
- आज पुणे येथे चिंतन बैठकीतील ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांची भूमिका!
error: Content is protected !!