डॉ. ज्योती मेटे यांना विजयी करणे हीच स्व. विनायकराव मेटेंना खरी श्रद्धांजली ठरेल :ऍड.राम औटे
- डॉ. ज्योती मेटे यांना विजयी करणे हीच स्व. विनायकराव मेटेंना खरी श्रद्धांजली ठरेल :ऍड.राम औटे
- बीड (प्रतिनिधी): बीड विधानसभा निवडणूक ऐन रंगात आलेली असून आयुष्यभर आरक्षणाचा लढा प्रभावीपणे लढणाऱ्या स्व. विनायकराव मेटे यांच्या पत्नी डॉ.ज्योती विनायकराव मेटे या बॅटरी टॉर्च या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढत आहेत. मतदारांनी डॉ.ज्योती मेटे यांना विजयी करणे हीच स्व. विनायकराव मेटे यांना आणि त्यांच्या आरक्षण लढ्याला खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत ऍड. राम औटे यांनी व्यक्त केले आहे.
- मराठा महासंघाच्या मुशीतून घडलेल्या विनायकराव मेटे यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत मराठा, मुस्लिम आरक्षणाचा लढा प्रभावीपणे लढला. आरबी समुद्रातील शिवस्मारक उभारणीसाठी त्यांनी मोठा संघर्ष केल्यामुळेच पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन झाले. मराठा आरक्षण बैठकीला जातअसतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हा लढा अर्ध्यावर सुटला आहे. आरक्षणाचा प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी आणि आरबी समुद्रातील शिवस्मारक पूर्ण करण्यासाठी स्व. विनायकराव मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना निवडून देणे जितके गरजेचे आहे तितकीच सर्वांची सामाजिक बांधिलकी आहे. म्हणून डॉ. ज्योती मेटे यांना निवडून देणे हीच स्व. विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ऍड. राम औटे यांनी म्हटले आहे.
error: Content is protected !!