23.2 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

अनिलदादा जगताप यांना मराठा संग्राम पक्षाचा जाहीर पाठिंबा!

  • अनिलदादा जगताप यांना मराठा संग्राम पक्षाचा जाहीर पाठिंबा!
  • समाजाशी एकनिष्ठ राहणाऱ्या अनिलदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू- भिमराव कोकाटे पाटील
  • =============
  • बीड, प्रतिनिधी- विधानसभा निवडणुकीच्या रनधूमाळीत बीड विधानसभा अपक्ष उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांच्याकडे दरदिवशी जाहीर प्रवेश होत आहेत तर अनेक मातब्बर व्यक्ती आणि संघटन अनिलदादांना पाठिंबा देत आहेत.  काल दि. 11 नोव्हेंबर रोजी सायं 6.00 वाजताच्या दरम्यान बीड विधानसभा अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांना मराठा संग्राम पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहिर पाठींबा देण्यात आला आहे.
  •   बीड विधानसभा मतदार संघात गेली अनेक वर्षापासून सामाजिक चळवळ असो, या राजकीय क्षेत्र असो या मतदार संघात  अनिलदादा यांनी समाजसेवक म्हणून खुप मोठ्या प्रमाणात योगदान राहिलेले आहे. जन सामान्याच्या हितासाठी अनिलदादा यांनी कायम प्राधान्याने पुढाकार घेऊन त्यांच्या समस्या अडचणी सोडवल्या आहेत म्हणुन संपुर्ण बीड विधानसभा मतदार संघात लोकप्रिय अपक्ष उमेदवार सन्माननिय अनिलदादा जगताप यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. म्हणून समाजाशी एकनिष्ठ राहणा-या नेतृत्वास विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देऊन आम्हाला अनिलदादा यांची ताकद वाढवायची आहे आणि अनिलदादांना विक्रमी मतांनी विजयी करायचे आहे आणि त्यासाठी आम्ही एकजुटीने जीवाचे रान करू अशी भावना भिमराव कोकाटे पाटील संस्थापक अध्यक्ष मराठा संग्राम पक्ष महाराष्ट्र राज्य यांनी व्यक्त केली. अनिलदादा जगताप यांनी भिमराव कोकाटे पाटील यांचे स्वागत करत आभार व्यक्त केले. याप्रसंगी अनिलदादा जगताप यांच्यासोबत सहकारी कार्यकर्ते समर्थक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

°°°°°

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!