28.5 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

ऑल इंडिया पॅंथर सेना पक्षाच्या अपक्ष उमेदवार नितीन सोनवणे यांचा प्रचाराचा झंझावात सुरू.!

  • ऑल इंडिया पॅंथर सेना पक्षाच्या अपक्ष उमेदवार नितीन सोनवणे यांचा प्रचाराचा झंझावात सुरू.!
  • बीड प्रतिनिधी:-बीड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार नितीन उत्तमराव सोनवणे यांनी बीड शहरातील सर्व महापुरुषांचा अभिवादन करून प्रचाराला सुरुवात करून प्रत्यक्षात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून समाजसेवेत आपले वेगळे स्थान निर्माण करणारे गोरगरिबांची सेवा करून न्याय मिळवून देणारे दलित मुस्लिम आदिवासी व बहुजन यांच्या हक्कासाठी संघर्षाची लढाई लढणारे सोनवणे यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विकास करू म्हणून मताचा जोगवा मागणाऱ्या प्रस्थापित कुटुंबाने चाळीस वर्षे बीड मध्ये नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य,आमदार, खासदार, सर्व पदे स्वतःच्या कुटुंबातच घेतले गेली तीस ते चाळीस वर्षे प्रस्थापित कुटुंबाने बीडच्या विकासाची विल्हेवाट लावली बीड मतदारसंघातील अल्पसंख्याक वॉर्डात रस्ते,नाली व पाण्याची सुविधा नाही.आता बीड मतदारांना एक सुवर्ण संधी आली आहे बीडचा विकास करण्यासाठी नितीन सोनवणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करून बीडचा विकास करण्याची द्यावी त्यांचे निवडणूक चिन्ह बॅट आहे आज मतदारांच्या भेट घेत असताना काही मतदारांनी त्यांना करीत असलेल्या कार्याचे कौतुक करून त्यांना आश्वासित केले व ग्रामीण भागातील मतदारांनी त्यांचे स्वागत केले तर उमेदवार नितीन सोनवणे कॉर्नर सभा घेत मतदारांची संवाद साधणार आहेत. एक ऊसतोड कामगाराचं लेकरू प्रस्थापितांच्या विरोधात लढत असलेल्या लढाईत मतदार राजा त्यांच्यासोबत आहे असे नागरिकांतून चर्चा आहे.यावेळी जन आशीर्वाद दौऱ्याची सुरुवात करताना तालुकाध्यक्ष कावेरी जाधव, तालुका संघटक पापाभाई शेख, तालुका उपाध्यक्ष निसार शेख, शहराध्यक्ष उमेश पारिख, शहर संघटक सोनीताई जांगडा, मिस्त्रीलाल जांगडा शहर संघटक, दिक्षा मिरपगार,सय्यद अदनान,व असंख्य कार्यकर्ते आदीसह बालाघाटावरील ग्रामीण भागातील मतदार बांधव उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!