परळीत दुसऱ्या दिवशीही महायुतीच्या प्रचार फेरीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
परळीत धनंजय मुंडेच! अबाल वृद्धांचा विश्वास
परळी वैद्यनाथ – परळी विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ परळी शहरातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी आज दुसऱ्या दिवशी काढलेल्या प्रचार फेरीसही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
परळीच्या आपल्या हक्काच्या माणसाला निवडून द्यायचे… बाहेरचा कशाला? आजच्या प्रचार फेरीत एका वयोवृद्ध महिला मतदाराने आपली भावना व्यक्त केली. अबाल-वृद्ध नागरिकांमध्ये परळीत अशा चर्चा असून, आता फक्त धनंजय मुंडेच! असा निर्धार शहरातील मतदारांनी केल्याचे दिसून येत आहे.
शहरातील पंचशील नगर,कंडक्टर कॉलनी, माधवबाग,लूंबीनी नगर,शारदा नगर,सोमेश्वर नगर,जलालपूर या भागात भव्य फेरी काढण्यात आली होती. यावेळी मतदार बंधू भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत धनुभाऊंना सर्वाधिक मताधिक्य देवू हा विश्वास व्यक्त केला.प्रचार फेरीत राष्ट्रवादी,भाजप, शिवसेना,रि.पा.ई. व अन्य मित्र पक्ष महायुतीचे असंख्य पदाधिकारी-सहकारी उपस्थित होते.