गेवराई मध्ये एकाच नावाचे तीन उमेदवार रिंगणात…
कोणते नाव आहे पहा सविस्तर…
बीड प्रतिनिधी – महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सर्वच पक्षातील नेत्यांनी कंबर कसली आहे. अनेक उमेदवारांनी प्रचार सुरु केलाय. पण निवडणुकीच्या दिवशी या उमेदवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण एकाच नावाचे तीन उमेदवार निवडणूक लढवत असल्याने मतदारांमध्येही गोंधळ उडणार आहे. बीड मधील गेवराई मतदार संघात अपक्ष उमेदवार लक्ष्मण माधवराव पवार निवडणुक लढवत आहेत.
पण याठिकाणी दोन लक्ष्मण पवार नावाच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे एकूण 3 लक्ष्मण पवार उमेदवार असणार आहेत. गेवराई मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बदामराव पंडित आणि महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित तसेच मनसेच्या उमेदवार मयुरी बाळासाहेब मस्के खेडकर यांच्यामध्ये लढत असून अपक्ष म्हणून माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे परंतु लक्ष्मण पवार नामक तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे. पवार लक्ष्मण अंबादास, पवार लक्ष्मण माधवराव, पवार लक्ष्मण विठोबा हे लक्ष्मण पवार नामक तीन उमेदवार आहेत. लक्ष्मण पवार नावाचे सुद्धा तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरलाय.
म्हणजे ईव्हीएम मशीनवर 3 लक्ष्मण पवार उमेदवार असणार आहेत.