मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, ४५ जणांना उमेदवारी; कुणाकुणाला संधी?
मुंबई प्रतिनिधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वतीने 45 उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे.बहुतांश विद्यमान आमदारांचा यात समावेश आहे.
एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडीतून मैदानात
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीमधील घटक पक्ष असणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोपरी पाचपाखाडी येथून विधानसभा निवडणूक लढणार आहेत.
मंत्री उदय सामंतांसह त्यांच्या भावाचा समावेश
शिंदेंच्या शिवसेनेच्या पहिल्या यादीत मंत्री उदय सामंत यांच्या नावाचा समावेश आहे. शिवाय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरीमधून मंत्री उदय सामंत यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर दापोलीमधून योगेश कदमांना तिकीट देण्यात आले आहे. मात्र गुहागर विधानसभा मतदारसंघाची जागा पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलेली नाही.