- शिवसंग्रामच्या ज्योती मेटेंचा शरद पवार गटात प्रवेश
- राष्ट्रवादीकडून बीडमधून उमेदवारी मिळण्याची चर्चा..?
- बीड प्रतिनिधी:- पुढील महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षानं जोरदार तयारी केलेली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. याचदरम्यान दोन तीन दिवसापूर्वी दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी शरद पवार गटासोबत चर्चा केली होती. आता विधानसभेवेळी त्यांनी शरद गटात प्रवेश केलाय. शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला असून त्यांना बीडमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
- मराठा आरक्षणाबाबत नेहमी आग्रही राहिलेले शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या ज्योती मेटे या पत्नी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी बीडमध्ये तीव्र आंदोलने हे गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून मराठा आंदोलनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीशी सांगड घालण्यात येतं असल्याचं सांगितलं जातंय.