- मुख्याधिकारी कोमात; मोकाट कुत्रे जोमात.
- तीन वर्षाच्या चिमुकलीचे मोकाट कुत्र्यांनी तोडले लचके. त्वरित कुत्र्यांचा बंदोबस्त करा नसता आंदोलन करण्यात येईल- नितीन सोनवणे.
- बीड प्रतिनिधी:- चिऊ डोंगरे वय 3 वर्षे प्रकाश आंबेडकर नगर ईमामपुर रोड बीड ही चिमुकली घरासमोर खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्यानं अनेक जागी चावा घेतलेला आहे.
- बीड शहरात मोकाट कुत्रे व जणावरे यांचा बंदोबस्त करा. अन्यथा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने लोकशाही मार्गानें रस्तावरील मोकाट कुत्रे घेऊन मुख्याधिकारी यांच्या कॅबीन मध्ये सोडन्यात येईल. मंगच मुख्याधिकारी यांना कळेल. की सर्व समान्य जनतेला मोकाट कुत्र्यांचा काय त्रास सहन करावा लागतो. ज्या वेळेस मोकाट कुत्रे संबंधित अधिकार्यांचे लचके तोडत नाहीत तो पर्यंत या भ्रष्ट अधिकार्यांना जाग येणार नाही.
- आज पर्यंत शहरां मध्ये शेकडो लहान मुला पासुन तर व्रध महीलांचे या मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले त्या नंतर आज पर्यंत शेकडो तक्रारी मुख्याधिकारी यांच्या कडे केलेलें असुन परंतु मुख्याअधिकारींनी त्या तक्रारीला जाणीव पुर्वक केराची टोपली दाखवली..