24.2 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

येतील किती जातील किती येऊ द्या किती बी डजनात पृथ्वीराज साठे साहेबच होणार आमदार ते पण वजनात- मेघराज भैय्या गालफाडे

  • येतील किती जातील किती येऊ द्या किती बी डजनात पृथ्वीराज साठे साहेबच होणार आमदार ते पण वजनात- मेघराज भैय्या गालफाडे
  • बीड :- केज विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात डझनभर उमेदवारांनी प्रवेश केला आहे. प्रवेश केल्या केल्या त्यांना आमदारकीचे तिकीट हवे आहे. तिकीट मिळवण्यासाठी पक्षाशी एकनिष्ठ राहावे लागते. निवडणुकीच्या तोंडावर केज मतदारसंघातील वातावरण सध्या शरदचंद्र पवार पक्षाच्या बाजूने झुकलेले आहे .त्यामुळे केज मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नवखे चेहरे असले तरी उमेदवारी आपल्यालाच मिळणार आपण निवडून येणार असा अति आत्मविश्वास बाळगून असलेल्या अंजली घाडगे यांचा देखील यात समावेश आहे. मागच्या वेळी भाजपची उमेदवारी मागणाऱ्या डॉ.अंजली घाडगे यांना भाजपने उमेदवारी नाकारतात भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसचे अशोक चव्हाण रजनी ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऐनवेळी आय काँग्रेसमध्ये प्रवेश केला व मागची विधानसभेचे निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली मात्र दुर्दैवाने यात डॉ. अंजली घाडगे या पराभूत झाल्या पराभूत होताच अंजली घाडगे यांनी लगेच काँग्रेसला सोडचिट्टी देऊन शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला तेथेही काही काळ लोटतो तोच पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडचिट्टी देऊन शिवसेना शिंदे गटात सामील झाल्या. आता शिंदे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत निवडणुकीच्या तोंडावरच शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पाच वर्षात पाच वेळा पक्ष बदलणाऱ्या डॉ.अंजली घाडगे यांना जनतेने एकदा नाकारले आहे पुन्हा शरदचंद्र पवार पक्षाकडे एका स्थानिक बड्या पुढाऱ्याचा वशिला लावून तिकीट मलाच मिळणार आहे असे जोरदार चर्च सुरू आहे. जरी उमेदवारी मिळाली तरीही मतदार संघातील जनता डॉ. अंजली ताई घाडगे यांना स्वीकारणार नाही कारण केज मतदार संघातील जनतेच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेबच आहेत कारण काँग्रेसमध्ये शरदचंद्र पवार आणि अजितदादा पवार यांच्यात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्ह्यात बीडचे विद्यमान आमदार संदीप भैया शिरसागर व केजचे माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब हे दोनच शिलेदार शरदचंद्र पवार साहेबांच्या सोबत खंबीरपणे व निष्ठेने उभे राहिले होते. पक्ष आणि नेतृत्व अडचणीत असताना पडत्या काळात अडचणीच्या वेळी पक्ष सोबत व शरद पवार साहेबांचा सोबत राहून या दोन शिलेदारांनी बीड जिल्ह्यातून खंबीरपणे साथ दिली आहे हे पक्ष नेतृत्वाला विसरून चालणार नाही. नेतृत्व आणि पक्ष संकटात सापडल्या नंतर सत्तेची कास न धरता शरदचंद्र पवार साहेबांना खंबीरपणे साथ देणारे केज विधानसभेचे माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब विसरून चालणार नाही कारण पक्षाला कायम साथ देणारे अडीअडचणीच्या काळात देखील पवार साहेबांसोबत खंबीरपणे उभे राहणारे व निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना अडीच वर्षाचा आमदारकीचा काळ भेटला असताना साठे साहेबांनी मतदारसंघात अनेक विकास कामे करून जनसामान्य माणसात आपला आगळावेगळा ठसा उमटवला आहे त्यामुळे साठे साहेब हे केज मतदार संघातील सामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत निष्ठावंत साठे यांनाच केज विधानसभेची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळायला हवी अशी भावना जन सामान्यत व प्रत्येकाच्या मनामनात आहे या भावनेचा आदर करून पक्षाने पृथ्वीराज साठे साहेब यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी देखील मतदारसंघातून जोर धरत आहे. कारण प्रत्येक गावा गावात साठे साहेब हे गेले आहेत पाच वर्षापासून मतदार संघात सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी झगडत आहेत साठे यांच्याशी मतदारसंघातील जनतेचे नाळ जोडली गेली आहे . वेगवेगळ्या आंदोलनात आणि पक्षीय कार्यात सतत सक्रिय सहभागी असणाऱ्या व सर्वसामान्य नागरिकांच्या सुख दुःखात कायम सहभागी असणारे माजी आमदार पृथ्वीराज साठे हेच तेच मतदारसंघातील जनतेच्या मनातील राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत. अशीच केज मतदार संघातील जनसामान्यात भावना बनलेली आहे. त्यामुळे माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब यांनाच उमेदवारी देऊन केज मतदार संघातील जनसामान्यांच्या भावनांची कदर करावी लागेल. अन्यथा पक्षाला मोठी किंमत मोजावी लागेल.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!