24.2 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

सन-2023-24’कायाकल्प’ कार्यक्रमांतर्गत स्त्री रुग्णालय नेकनूर ठरले राज्यात सर्व प्रथम.

  • सन-2023-24’कायाकल्प’ कार्यक्रमांतर्गत स्त्री रुग्णालय नेकनूर ठरले राज्यात सर्व प्रथम.
  • बीड प्रतिनिधी:- सन 2023-2024 मध्ये राज्य शासना तर्फे गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत बीड जिल्ह्यातील सर्व रुग्णालयातील आरोग्य संस्थामध्ये राबवण्यात आलेल्या सुधारित कार्यक्रमात बीड जिल्ह्यातील एकूण 26 रुग्णालयइन आरोग्य संस्थांनी सहभाग घेतला यामध्ये रुग्णालयातील आरोग्य संस्था पैकी 22 रुग्णालयाचे आरोग्य संस्था External असेमटेसाठी प्राप्त ठरले त्या अनुषंगाने 11-2024 रोजी मा आयुक्त राज्य आरोग्य सोसायटी मुंबई यांच्याकडून निकालाची घोषणा करून स्त्री रुग्णालय नेकनुर यांना राज्यातून प्रथम घेऊन रु 50 लक्ष बक्षीसास प्राप्त ठरले.
  • कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा स्तरा वरुन तत्कालीन जिल्हाशल्यचिकित्सक डॉ बडे सर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ उल्हास गंडाळ सर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ तांदळे सर यांचे बहुमोल मार्गदर्शन अणि जिल्हा गुणवत्ता आश्वासक टीम मधील सर्व सदस्य डॉ दराडे मॅडम व बापू निकाळजे यांचे मार्गदर्शन लाभले. नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोकजी थोरात सरांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
    स्त्री रुग्णालय नेकनुर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच विशेष करून सहाय्यक अधिसेविका, सर्व परिसेविका व आधी परीचारीका, मुकादम अणि सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच डाटा एंट्री ऑपरेटर यांचे स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक हुबेकर यांनी अभिनंदन केले आहे. तसेच वरिष्ठांनचे आभार मानले आहेत. या पुरस्काराचा निधी शासनाच्या प्रात होणार्‍या मार्गदर्शक सूचने नुसार रूग्ण कल्याण तसेच रुग्णाकरिता अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्या करिता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सूचनेनुसार वापरण्यात येईल अशी वैद्यकीय अधीक्षक डॉ हुबेकर यांनी माहिती दिली आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!