माजलगावात सत्यशोधक महोत्सव उत्साहात साजरा..
- माजलगावात सत्यशोधक महोत्सव उत्साहात साजरा..
- – गायिका मंजुषा शिंदे, संतोष मोरे यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध
——-
माजलगाव, प्रतिनिधीः: शहरामध्ये युवा नेते अमोल शेरकर यांचे वतीने अण्णाभाउ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमीत्त दि. 4 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात सत्यशोधक महोत्सव महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात साजरा करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्ातील सुप्रसिध्द गायिका मंजुषा शिंदे तसेच गायक संतोष मोरे यांचा परिवर्तनातील वादळ वारा कार्यक्रम झाला.
- कार्यक्रमाचे उद्घाटन बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख उपस्थितीत जयसिंग सोळंके, एकनाथ मस्के, राहुल लंगडे, रोहन घाडगे, शंतनु सोळंके, अविनाश जावळे, राकेश साळवे, पवनराजे देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी गायिका मंजुषा शिंदे, संतोष मोरे यांनी अण्णाभाउ साठे यांच्या जिवनचरित्रावरील व आंबेडकरवादी विवीध गीत सादर करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले तर सद्दाम शेख यांच्या मिमीक्रीमुळे श्रोते भारावुन गेले. कार्यक्रमास शहरासह तालुका परिसरातील बहुजन चळवळीतील हजारो जाणकार श्रोत्यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केतन मिसाळ, हनुमंत तुपसौंदर, विक्रम वाघमारे, दिपक शेरकर, राहुल हिवाळे, विकास जाधव, विजय शेरकर, विष्णु कांबळे, बळी वैराळे, जगदीश थोरात, नितीन गायकवाड, मधुर ताटे, सनी शेरकर, बबलु शेरकर, शंकर आलाट, बालाजी आलाट, गणेश आलाट, सुनिल अवचार, बाळु अवचार, यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!