32.4 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

ग्रामपंचायत कार्यालय अंधापुरी घाट येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन.!

  • ग्रामपंचायत कार्यालय अंधापुरी घाट येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन.!
  • 🔲 उपसंपादक -दिपक वाघमारे
  • बीड दि,१: बीड तालुक्यातील मौजे अंधापुरी घाट येथे ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने महापुरुषाला,अभिवादन करण्यात आले.
  • प्रभावी लेखणीतून,अनमोल वाणीतून वंचितांच्या व्यथा प्रखरपणे मांडणारे,साहित्यिक,लेखक,समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बुलंद आवाज लोकशाहीर साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय अंधापुरी घाट या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
  • जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयाचे वतीने तसेच गावकऱ्यांच्या वतीने व वाघमारे मित्र मंडळाच्या वतीने डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती निमित्त लोकशाहीराला अभिवादन करण्यात आले.
  • यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच वाघमारे मित्र मंडळ उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!