गेवराई तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांची बीडीओ कांबळेंकडून पाहणी
——————
गेवराई तालुक्यातील तांदळा येथे साधला ग्रामस्थांशी संवाद
गेवराई : सोमनाथ मोटे सह शाम जाधव
बीड जिल्ह्यातील गेवराई तालु क्यात मनरेगा अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे झाली असून त्या कामाची गेवराई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती एम.एस.कांबळे यांच्या कडून सध्या पाहणी होत आहे. दरम्यान बुधवार दि.३१ जुलै रोजी ग्रामपंचायत तांदळा येथील मनरेगा अंतर्गत जलसिंचन विहीरीच्या कामाची गटविकास अधिकारी श्रीमती कांबळे एम.एस.यांनी थेट प्रत्यक्षात पाहणी करुन ग्रामपंचायत कार्यालयात बसून लाभार्थ्यांच्या कुशल देयाकावर सह्या केल्या यामुळे लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरु असलेल्या तांदळा येथील जलसिंचन विहीरीच्या कामांची गेवराई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती कांबळे एम.एस यांनी पाहणी करुन कामाची खात्री करत तांदळा ग्रामपंचायत कार्यालयात बसून लाभार्थ्यांच्या कुशल देयकावर सह्या केल्या तसेच मनरेगा अंतर्गत सुरु असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी सरपंच सोनाली गवते, ग्रामसेवक अशोक बहिर , उपसरपंच मिरा सिरसट , तांत्रिक सहाय्यक इंजी.मंगेश लोणकर , रोजगार सेवक सोपान शेंबडे यांच्यासह लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.