गजापूर विशाळगड मध्ये झालेल्या घटने संदर्भात AIMIM बशीरगंज येथील निदर्शनास ऑल इंडिया पँथर सेनेचा जाहीर पाठिंबा- पॅंथर नितीन सोनवणे
बीड प्रतिनिधी :-मुस्लिम समाजाच्या अस्मितेचा आणि भावनांचा संबंध ज्या धार्मिक स्थळाशी असतो त्या धार्मिक स्थळावर काही द्वेषीवृत्तीचे लोक अचानकपणे हल्ले चढवतात हातात तलवारी काट्या घेऊन मुस्लिमांच्या धर्मस्थळाची आणि घरादारांची संपत्तीची तोडफोड करून त्यांच्या संपत्तीची लूट करतात त्यांना मानसिक आर्थिक नुकसान पोहोचवतात याला तीन-चार दिवस उलटून गेले तरी यावर सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष व मीडिया बोलायला तयार नाही याचा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत.
विशाळगडाच्या अतिक्रमणाचा विषय हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे त्यासाठी कायदा आहे शासन आहे कायद्यानुसार त्यावर निर्णय होईल अशाप्रकारे धुडगुस घालून तलवारी हातात घेऊन उद्रेक पसरवण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात होत आहे हा अशोभनीय आहे आणि स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे या गंभीर प्रकरणावर साधी प्रतिक्रिया सुद्धा देत नाहीत ही सर्वात मोठी शोकांतिका आहे विशाळगड प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्यात यावी व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी ऑल इंडिया पॅंथर सेना बीड जिल्ह्याच्या वतीने मागणी करत आहोत.
संघटनेच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी मार्फत गृहमंत्र्याकडे मागणी करत आहोत या सर्व घडलेल्या घटनेची सखोल चौकशी CID मार्फत करण्यात यावी. यामधील सर्व हल्लेखोरांवर UAPA कायद्या अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी.
संबंधित निष्क्रिय पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे तात्काळ निलंबित करण्यात यावे.
मुस्लिम समाजाच्या घरांची प्रत्येकी 10 लाख रुपये व स्थळांची शासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी. अन्यथा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल.