मराठा जनजागृती व शांतता रॅली निमित्त चहा व नाश्त्याची सोय:-पॅंथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे
बीड प्रतिनिधी-बीडमध्ये मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली काढण्यात आली होती या रॅलीत बीड जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता या रॅलीत मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेकडून पाणी व नाष्टाची उत्तम सोय जिल्हा परिषद येथे स्टॉल लावून करण्यात आली होती.
अशी माहिती ऑल इंडिया पॅंथर सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकातून दिली ऑल इंडिया पॅंथर सेना सुरुवातीपासूनच सामाजिक प्रश्नांवर अन्याय अत्याचारावर आवाज उठवण्याचे काम करत आलेली आहे तसेच मराठा आरक्षणासाठी करोडोचे मोर्चे काढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात त्या त्या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते आपला सहभाग नोंदणीत आले आहेत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली बीडमध्ये मराठा समाज बांधवांच्या मोर्चात पाणी व नाश्ता याची सोय करून ऑल इंडिया पॅंथर सेनेने सामाजिक बंधुभाव जोपासला आहे या कार्यक्रमास नितीन सोनवणे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना, वसीम भाई शेख, ज्ञानेश्वर कवठेकर, सुधीर कतले, गुड्डू जावळे, राजेश चव्हाण, मोबीन शेख, व संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.