24.2 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

डॉ.बाबू जोगदंड यांच नियोजन छान; बाला घाटाने सोनवणेंना मिळवून दिला विजयाचा मान!

डॉ.बाबू जोगदंड यांच नियोजन छान; बाला घाटाने सोनवणेंना मिळवून दिला विजयाचा मान!

बीड प्रतिनिधी:-लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांच्या गळ्यात विजयाची माळ घालण्यात बालाघाटाने महत्त्वाची भूमिका बजावली.बूथ मॅनेजमेंट, शेवटच्या कार्यकर्त्यां पर्यंत सुसूत्र नियोजन लावून डाॅ.बाबू जोगदंड यांच्यातील “चाणक्या”ची चुणूक दिसून आली.

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात अटीतटीची लढाई झाली. या निवडणुकीत राजकीय धुरीनांना देखील विजयश्री कोणाला मिळेल याचा अंदाज बांधणं अवघड होऊन बसलं होतं. मतमोजणीच्या दिवशी तर ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांची प्रत्येकाला आठवण झाली.इतकी काट्याची टक्कर कधीच अनुभवाला आली नव्हती.भाजप उमेदवारांने 38 हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतल्यानंतर तर भाजपचा विजय निश्चित मानला जात असतानाच बालाघाटाने तोंडाशी आलेला घास अक्षरशः हिरावून घेतला. बालाघाटावरील ईव्हीएम मशीनच्या आकड्यांमूळे विजय दुरावला जाऊ लागला.बजरंग सोनवणे विरोधी उमेदवाराची आघाडी तोडण्यात यशस्वी होऊ लागले. जसजशा शेवटच्या फेऱ्या मोजल्या जाऊ लागल्या तसतसं विजय कोणाचा? हे ठरवणं आणखी अवघड होऊन बसलं.त्यातच शेवटच्या टप्प्यात काय घडणार याची उत्कंठा प्रत्येकाला च लागली. शेवटी विजयाची माळ बजरंग सोनवणे यांच्या गळ्यात टाकण्यात बालाघाटाला यश आलं.बालाघाटाने मिळवून दिलेल्या यशाचा पडद्यामागचा सूत्रधार मात्र पडद्यामागेच राहिला गेला, प्रसिद्धीपासून त्याने अलिप्तता बाळगली.डॉ. बाबू जोगदंड यांनी ही कामगिरी फत्ते करून दाखवली बारामती लोकसभेच्या प्रचाराची धुरा सांभाळत असताना त्यांनी आपल्या भागाकडे देखील तितकंच बारकाईने लक्ष ठेवलं.प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांची फळी उभा करत आपली प्रचार यंत्रणा कामाला लावली. मायक्रो मॅनेजमेंट ( सूक्ष्म नियोजन) च्या माध्यमातून प्रत्येक सूत्र त्यांनी हलवली. वरवरून भाजप उमेदवाराला अनुकूल वातावरण दिसत असलं तरी आतून मात्र वेगळच चित्र निर्माण करण्यात आपल्या हातखंड्याचा, चाणक्य नीतिचा त्यांनी वापर करत. घाटमाथ्यावरील भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना डॉ. जोगदंड यांनी लीलया चितपट केलं.यामुळे येणाऱ्या निवडणुकां मधून राजकीय समीकरणं बदलवण्यात वारं फिरवण्यात डॉ .बाबू जोगदंड यांच्या अनुभवाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर होणार आहे तर प्रतिस्पर्धी असलेल्यांना कात्रजचा घाट दाखवणारा ठरणार आहे ‌

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!