मनोज जरांगे पाटील यांना पार्थ पवारांसारखी वाय दर्जाची सुरक्षा द्या.:- पॅंथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे.
बीड प्रतिनिधी :- मराठा आंदोलक मा.श्री.मनोज दादा जरांगे पाटिल यांच्या घराची टेहाळणी ड्रोन कँमेऱ्यामार्फत केली जाते आणि त्याचा रिमोट कंट्रोल कोणाकडे आहे तेच अजून कळाले नाही यासाठी मातोरी गावातील लोकांबरोबर मराठा समाजामध्ये भित्तीचं वातावरण निर्माण झालेले असून सामाजिक सल्लोखा बिघडण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने त्यांना पार्थ पवारांसारखी वाय दर्जाची सुरक्षा देण्यात यावी असे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे नितीन सोनवणे (जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅथर सेना) वशीम भाई शेख (सचिव), कावेरी जाधव (महीला शहर अध्यक्ष) दयाबाई वाघमारे यांनी मागणी केली.
संघर्ष योध्दा मा.श्री. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे. कालची ड्रोन कँमेऱ्यामार्फत टेहाळणी होत असल्याने समाज भयभित झाला असून लाख गेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा गेला नाही पाहिजे हि समाजाची भावना असते.
आज मनोज जरांगे पाटिल हे मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत असून मराठा समाज त्यांच्यासाठी काहिही करण्याची मानसिकता दर्शवणा दिसत आहे.
काल पर्वा झालेली जी घटना आहे त्यात मनोज जरांगे पाटील हे आपल्या घरी असतांना त्यांच्या घरावरुन ड्रोन कैमेरा फिरत असल्याचे गावातील लोकांनी पाहिलं आहे आणि हे एकदाच नाही तर हे दूसऱ्यांदा होत आहे.
आज मनोज जरांगे पाटील म्हणजेच महाराष्ट्रातील करोडो मराठा समाजाचे दैवत असल्याची प्रतिमा निर्माण झाली असून त्यांना काही हानी पोहचल्यास महाराष्ट्रातील मराठा समाज गप्पं बसणार नाही तर मनोज जरांगे पाटील म्हणजे सर्व मराठा समाजचं आज काळिज आहे आणि काळजाला धक्का लागणं हे कोणताच समाज शांत रहाणं शक्य नाही.
तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत लोकशाही मार्गाने समाजाच्या हिताचा लढा देण्याऱ्याची सुरक्षा करणं हे आपल्या घटनेत नमुद असून अशा लोकांची सुरक्षा ही समाजाच्या व राज्याच्या हिताची ठरत असते यासाठी सामाजिक सलोखा आबाधित ठेवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे म्हणून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देऊन त्यांचं सौरंक्षण करावं अशी मागणी नितीन सोनवणे (जिल्हाध्यक्ष )ऑल इंडिया पॅथर सेना, वशीम भाई शेख(सचिव), कावेरी जाधव (महीला शहर अध्यक्ष), दयाबाई वाघमारे यांनी बीड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे.