26.6 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

बहुजन महापुरुषांच्या विचारांचा अनुयायी म्हणून कायम रस्त्यावरची लढाई लढणार – अमोल शेरकर

  • बहुजन महापुरुषांच्या विचारांचा अनुयायी म्हणून कायम रस्त्यावरची लढाई लढणार – अमोल शेरकर
  • 🔲उपसंपादक-दिपक वाघमारे 
  • माजलगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र हा बहुजन महापुरुषांच्या नावाने जसा ओळखला जातो, त्याचप्रमाणे माझी ओळख त्यांचा अनुयायी म्हणून राहावी यासाठी बहुजनांच्या हितांचे प्रश्न घेऊन रस्त्यावरील लढाई लढणार असल्याचे मत अमोल शेरकर यांनी व्यक्त केले आहे.माजलगाव येथील वेंकटेश हॉटेल येथे आज दुपारी बीड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .या बैठकी वेळी मार्गदर्शन करताना अमोल शेरकर यांनी मत मांडले, पुढे बोलताना म्हणाले की मी डीपीआय आहे पक्षाचा जिल्हा प्रमुख या नात्याने अनेक कार्यकर्त्यांशी संवाद व काम करण्याचा योग मागील दहा वर्षात आला आहे मात्र पक्षश्रेष्ठीना कार्यकर्त्यांची जाणीव नसल्याने मी राजीनामा दिला आहे, मात्र कार्यकर्ता म्हणून बहुजन समाजाच्या प्रश्नांबाबत अतिशय जागृतपणाने त्यांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी शासन दरबारी लढा उभारून प्रश्न सोडवण्याचा काम कायम रस्त्यावरील लढाई उतरून करणार आहे त्यासाठी आपण मला बळ देऊ सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी केली या कार्यक्रमास उपस्थित अमोल वाघमारे , हनुमान तूपसौंदर , अनिल राधे कांबळे , विक्रम वाघमारे ,मिलिंद मुजमुले , केतन मिसाळ , कैलास क्षीरसागर ,अशोक थोरात , अशोक पाटोळे ,अभिषेक हातागळे जिल्हाभरातून आलेले प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
    हा कार्यक्रम आयुष्याची करण्यासाठी शंकर अलाट , दिपक शेरकर , राहुल हिवाळे, बाळू अवचार ,अक्षय थोरात , बाबुराव खंडागळे ,विष्णू शेरकर ,खंडू शेरकर , विष्णू कांबळे , सूरज अलाट , विशाल कांबळे , विजय शेरकर , जगदीश थोरात ,बबलू शेरकर , यांच्यासह अनेकांनी मदत केली आहे.!

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!