राष्ट्रपती पदाचे मानकरी राजाभाऊ गुळभिले यांचा बीड शहरातील क्रीडा प्रेमींच्या वतीने भव्य सत्कार समारंभ संपन्न
- राष्ट्रपती पदाचे मानकरी राजाभाऊ गुळभिले यांचा बीड शहरातील क्रीडा प्रेमींच्या वतीने भव्य सत्कार समारंभ संपन्न
- बीड /प्रतिनिधी:- बीड शहरातील जिव्हाळा बेघर केंद्र या ठिकाणी शहरातील चंपावती योगा ग्रुप,जाणीव प्रतिष्ठान,छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम,छत्रपती संभाजी महाराज मल्टी योगा ग्रुप यांच्यासह बीड शहरातील क्रीडा प्रेमींच्या वतीने व बीड पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ साहेब, शिक्षण अधिकारी तुकाराम पवार, पोलीस उपनिरीक्षक बी.बी.राठोड,नानासाहेब जाधव,बंडू आगलावे,मनोज डरपे,सचिन जवकर,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व नितीनभैया धांडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शितलकुमार बल्लाळ व मनोज डरपे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
- यावेळी बीड शहरातील सर्व क्रीडाप्रेमींनी एकत्रित येऊन भाजी मंडई येथील जिव्हाळा बेघर केंद्र या ठिकाणी बीड शहरातील पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत(राजू)गुळभिले यांना राज्यपाल रुपेश कुमार बैस यांच्या हस्ते दिनांक 6 जून रोजी मुंबई राजभवन या ठिकाणी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले यामुळे बीड जिल्ह्यातील शिरोपात आणखीन एक तुरा राजाभाऊ यांच्या माध्यमातून लागल्यामुळे सर्व उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते सत्कार संपन्न झाला यावेळी बल्लाळ साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व बीड शहरातील क्रीडाप्रेमींच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय घडामोडी मध्ये प्रत्येक समाजामध्ये जो द्वेषभाव निर्माण झालेला आहे यापासून दूर जाऊन सर्व क्रीडाप्रेमींनी पुढाकार घेऊन समाज सर्व समाज बांधवांना एकत्रित येण्यासाठी संदेश दिला व राष्ट्रपती विजेते राजाभाऊ गुळभिले यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी महेंद्रजी सारडा,विठ्ठल वीर, गणेश मस्के,जीवन बंड,गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर जगदीश पडूळे,प्रसिद्ध उद्योगपती राजुशेठ कोटेच्या,गजानन शिंदे,कैलास वीर,शिवाजी हिंदोळे, मिलिंद ओवाळ,दिलीप बेंद्रे,राजू शिंदे,शैलेश मुसळे यांच्यासह शहरातील मान्यवर मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगा ग्रुपचे सदस्य व जिव्हाळा केंद्राचे प्रमुख राजू वंजारे यांनी केले आभार प्रदर्शन कैलास वीर यांनी केले.
error: Content is protected !!