26.6 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

मोरगाव शिवारात वीज पडुन ४५०० ज्वारीच्या कडब्याची गंज जळुन खाक लाख रुपयांचे नुकसान 

  • मोरगाव शिवारात वीज पडुन ४५०० ज्वारीच्या कडब्याची गंज जळुन खाक लाख रुपयांचे नुकसान 
  • लिंबागणेश:– दि.०३ बीड तालुक्यातील मौजे.मोरगाव शिवारातील लक्ष्मणबाबाचा माळ याठिकाणी आज दि.३ सोमवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडुन पोपट सोनबा जाधव या शेतकऱ्याची ४५०० कडब्याची गंज जळुन खाक झाली असुन यात जवळपास १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमनावाडी येथील रहिवासी असणारे पोपट सोनबा जाधव आपल्या पत्नी व मुलासह गेल्या सहा वर्षांपासून मोरगाव येथील बापुराव कागदे यांच्या मालकीच्या १० एकर शेतामध्ये बटईने राबत होते. मोरगाव पासुन १ किलोमीटर अंतरावरील लक्ष्मणबाबाचा माळ याठिकाणी पत्र्याच्या घरात वास्तव्य करून राहतात.आज सायं साडेपाच वाजता घरी असताना अचानक वीज कडाडल्याचा आवाज आला. त्यांचा मुलगा संतोष यांने घराबाहेर पाहिले असता आवाज आलेल्या ठिकाणी ज्वारीच्या कडब्याची गंजीने पेट घेतला होता. तिघांनी हंड्याने पाणी घेऊन जाळ विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आलीच नाही. सायं साडेपाच वाजल्यापासून पेटलेली गंज रात्री साडे नऊ वाजेपर्यंत पेटलेलीच होती.यात ज्वारीच्या ४५०० कडबा जळुन खाक झाला असुन जवळपास १ लाख रूपयांचे नुकसान झाले. तलाठी मंडळ अधिकारी यांना फोनवरून कल्पना दिली असता आम्हाला फोटो पाठवा आम्ही ऊद्या येऊन बघतो असे उत्तर त्यांना मिळाले. आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाने गाजावाजा करणा-या प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्यायला हवी.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!