11 जून रोजी आश्रय सेवा केंद्राच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
इयत्ता 10 वी आणि 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी – आयेशा शेख रफिक
बीड प्रतिनिधी :- इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी 85% पेक्षा अधिक गुण घेतले आहेत अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते 11 जून रोजी करण्यात येणार आहे. या पुरस्कारास पात्र गुणवंत विद्यार्थ्यांनी 8 जून पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन आश्रय सेवा केंद्राच्या वतीने अध्यक्षा पत्रकार शेख आयेशा रफिक यांनी केले आहे.
इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी 85 टक्के पेक्षा अधिक गुण घेतलेले आहेत अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, समाजसेवक यांच्या शुभहस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सदरील सत्कार सोहळा स.मा. गर्गे भवन, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या मागे, तुळजाई चौक, बीड. या ठिकाणी मंगळवार दिनांक 11 जून रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.या सत्कारास पात्र असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले नाव 70 30 14 93 22 या व्हाट्सअप नंबर वर मार्क्स मेमोच्या कॉपी सह आपला पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर आणि संपर्क पत्ता पाठवून नोंदणी करावी. त्याचबरोबर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ पेन आणि सन्मानपत्र स्वीकारण्यासाठी आपल्या मित्रपरिवार आणि पाल्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या संयोजिका आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्षा पत्रकार शेख आयेशा रफिक यांनी केले आहे.
चौकट….
पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार..
प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया अंतर्गत पत्रकार म्हणून अथवा माध्यमांच्या विविध घटकांमध्ये जे काम करणारे पालक आहेत त्यांच्या ज्या पाल्यांनी इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये 70 टक्के पेक्षा अधिक गुण घेतलेले आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन विशेष सन्मानित करण्यात येणार आहे.
चौकट
राज्यातील गुणवंत किन्नरांचा सत्कार..
महाराष्ट्रामध्ये किन्नर असलेल्या तृतीयपंथीयाने इयत्ता दहावी अथवा बारावी परीक्षेमध्ये पास होऊन यश मिळवलेले आहे अशा सर्व गुणवंत किन्नरांचा बीड येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष बाब म्हणून जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरातील ज्या किन्नरांनी इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षेत यश मिळवलेले आहे अशा गुणवंत किन्नरांनी 70 30 14 93 22 या व्हाट्सअप नंबर वर आपल्या मार्क्स मेमोची झेरॉक्स, पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर, संपूर्ण पत्ता पाठवून सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने केले आहे.