सह्याद्री समाज मुंबई यांच्या सौजन्याने व जिव्हाळा बेघर निवारा बीड च्या वतीने ग्रामीण विकास प्रकल्प येळंब घाट येथे पाणपोई चे उद्घाटन..
🔲उपसंपादक-दिपक वाघमारे
येळंब घाट : ऍड.नरेंद्र राजपुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली व जिव्हाळा बेघर निवारा बीड यांच्या सहकार्याने चाकरवाडी रोड ग्रामीण विकास प्रकल्प येळंब घाट येथे चाकरवाडी कडे येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी व पशुपक्ष्यांसाठी पानपोई सुरू करण्यात आली. जिव्हाळा बेघर निवारा बीड यांच्यावतीने ग्रामीण विकास प्रकल्प ते चाकरवाडी रस्त्याच्या कडेने दहा हजार झाडे लावण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
ग्रामीण विकास प्रकल्पा अंतर्गत वृक्षमिञ जयदिप (आण्णा)वंजारे गेल्या 4-5 वर्षापासुन स्वखर्चातुन पर्यावरण बचाव मोहीम राबवत आहेत. विकत पाणी घेऊन वृक्ष लागवड करत आहेत.या उजाड रानावर त्यांनी वृक्षांची बाग फुलवून पर्यावरण बचावाचे मोलाचे कार्य करत आहेत.
जिव्हाळा बेघर निवारा केंद्र बीड यांच्या वतीने ग्रामीण विकास प्रकल्पाला यावेळी मोलाची मदत करण्यात आली व जिव्हाळा बेघर निवारा तसेच ग्रामीण परिवर्तन च्या वतीने ग्रामीण विकास प्रकल्पाच्या कार्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिव्हाळा बेघर निवारा बीड चे (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त) व्यवस्थापक राजु वंजारे,संचालक अभिजित वैद्य,आग्रवाल सर,बलभिम पवळे ,गौतम सर, ग्रामीण परिवर्तन चे टि.डी.राउत सर,पञकार दीपक वाघमारे,विनोद (भाऊ)वंजारे,प्रा.प्रशांत वंजारे ,सकाराम पायाळ.यश धम्मरत्न ,प्रकाश वंजारे आदि उपस्थितीत होते.