कु. साक्षी सोमनाथ (बाळासाहेब) राऊत ९४.२० गुण घेवून मिळविले घवघवीत यश
बीड प्रतिनिधी:-संत रविदास प्रतिष्ठानचे बीड जिल्हाध्यक्ष सोमनाथ (बाळासाहेब) राऊत यांची कन्या कु. साक्षी सोमनाथ (बाळासाहेब) राऊत हिने इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेत ९४.२० टक्के गुण घेवून घवघवीत यश मिळविल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
२०२३- २४ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्डच्या शालांत परीक्षेत संस्कार विद्यालयाची विद्यार्थीनी कु. साक्षी सामेनाथ (बाळासाहेब) राऊत हिने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात ९४.२०टक्के गुण संपादीत करुन यश मिळविल्याबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन केले जात आहे. तसेच या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिका वृंद या सर्वांचे योग्य मार्गदर्शनामुळे साक्षीच्या यश संपादनासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. तिच्या यशाबद्दल आजोबा बबन राऊत, आजी कुसूम डोईफोडे, आई अर्चना राऊत, वडिल सोमनाथ (बाळासाहेब) राऊत, संत रविदास प्रतिष्ठान चे संस्थापक तुळशीराम वाघमारे, प्रभारी अध्यक्ष आप्पा सोंनटक्के, शाम गायकवाड, गणेश शेवाळे, पांडूरंग रामगुडे, विष्णू गायकवाड, पुष्पा वाघमारे आदींनी कौतुक करुन अभिनंद केले.