बाळनाथ विद्यालय चाकरवाडी या शाळेचा 100% निकालाची परंपरा कायम..
बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे श्री उत्तरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ हनुमंत पिंपरी संचलित बाळनाथ विद्यालय चाकरवाडी ता. जि. बीड मार्च 2024 दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे. बाळनाथ विद्यालय चाकरवाडी या शाळेतील 54 विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते. 54 पैकी 54 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. शाळेने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थी विशेष प्राविण्यासह सात विद्यार्थी प्रथम श्रेणीत दोन विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. बाळनाथ विद्यालय चाकरवाडी या शाळेतून प्रथम क्रमांक शेळके संस्कार नेमिनाथ या विद्यार्थ्यांनी 97% घेऊन प्रथम क्रमांक उत्तीर्ण झाला आहे. आनवणे अंजली बाबुराव या विद्यार्थिनीने 92.80 % आणि माने धनश्री साहेबराव या सुद्धा विद्यार्थिनीने 92.80% या दोन विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक उत्तीर्ण झालेल्या आहेत. सावंत क्षितिजा कानिफनाथ या विद्यार्थिनीने 92.60% घेऊन तृतीय क्रमांक उत्तीर्ण झाली आहे. बाळनाथ विद्यालय या शाळेतील मुलींनीच यावर्षी पण बाजी मारली आहे. सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्री. उत्तरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई विनायकराव मेटे व सचिव श्री. आशुतोष भैय्या विनायकराव मेटे, प्रशासक प्राध्यापक श्री. फाटक पी. एफ. सर्व संचालक मुख्याध्यापक श्री. जगताप टी. आर. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ व सर्व पंचक्रोशीतील पालक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.