प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रेहान शेखने मिळवले दहावीत यश
पाली प्रतिनिधी :-आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्षा पत्रकार शेख आयेशा यांचा मुलगा शेख रेहान याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत 73 टक्के घेऊन यश मिळवले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पाली येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील विद्यार्थी रेहान शेख रफीक याने आर्थिक बिकट परिस्थितीवर मात करत कसल्याही प्रकारचे खाजगी क्लासेस न लावता स्वतः घरी अभ्यास करत शाळेच्या शिकवण्यावर लक्ष केंद्रित करत अभ्यास केला. घरात शैक्षणिक वातावरण पोषक नसताना सुद्धा अनंत अडचणीवर मात करत त्याने चिकाटीने अभ्यास करून हे यश मिळवले. परीक्षा सेंटर पाली पासून दहा किलोमीटर लांब नेकनुर येथे आलेले होते. जाण्यास सोय नसल्याने रिक्षाने, मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी काही अंतर पायी जाऊन त्याने जिद्दीने परीक्षा तर दिलीच शिवाय कसल्याही प्रकारची चीटिंग न करता स्वतःच्या हिंमतीने दहावी बोर्डाचे पेपर सोडून 73% मिळवत यश मिळवले आहे. त्याच्या या सुयशाबद्दल आई पत्रकार आयेशा शेख, रेहान शेख आणि शेख कुटुंबियांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. रेहान याला पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा आणि अभिनंदन.