कु. शिवानी बिरूबा फाटक हिचे दहावी बोर्ड परिक्षेत उत्तुंग यश
बीड प्रतिनिधी:-डॉ पारनेरकर महाराज विद्यालय मांजरसुंबा येथील कु. शिवानी बिरूबा फाटक हिने राज्य माध्यमिक शालांत परिक्षेत 93.80 टक्के गुण घेवून प्रथमश्रेणीत येण्याचा बहुमान मिळविला आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
कु. शिवानी बिरूबा फाटक हिने इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेमध्ये 93.20% गुण घेऊन उत्तुंग यश संपादित केले आहे. कु. शिवानी बिरूबा फाटक ही शिवसंग्राम चे युवा नेते पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर कोकाटे यांची भाची आहे.कु. शिवानी बिरूबा फाटक हिने अथक परिश्रम सातत्यपूर्ण अभ्यास करून घरीच अभ्यास करून हे यश संपादन केले आहे.कु. शिवानी बिरूबा फाटक ही खूप गुणवान असून लहानपणापासून विविध स्पर्धा परिक्षेतही तिने यश संपादन केले आहे. कु. शिवानी बिरूबा फाटक हिने सर्वच विषयांमध्ये चांगल्या प्रकारचे गुण घेतले आहेत.
अनंत अडचणीवर मात करत तिने चिकाटीने अभ्यास करून हे यश मिळवले आहे.शिवाय कसल्याही प्रकारची चीटिंग न करता स्वतःच्या हिंमतीने दहावी बोर्डाचे पेपर सोडून 93.20% मिळवत यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल डॉ पारनेरकर महाराज विद्यालय मांजरसुंबा या शाळेतून प्रथम आल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.