स्त्री रुग्णालयात चाललंय काय…? औषध गोळ्यांचा तुटवडा तर डॉक्टर यांची उशिरा उपस्थिती?
नर्सची पत्रकार बांधवाला अरेरावीची भाषा..
ठराविक मेडिकल वरून औषध खरेदीचा डॉक्टर व नर्सचा आग्रह.
नेकनुर प्रतिनिधी- बीड तालुक्यातील नेकनूर येथील स्त्री रुग्णालय मध्ये गोळ्या औषधांचा तुटवडा अनेक दिवसांपासून दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसांड होताना सुद्धा पाहायला मिळत आहे. अनेक औषध तसेच गोळ्या बाहेरून घेण्याचे डॉक्टर सांगत आहेत. पित्त गोळी, खोकल्याचे औषध तसेच अनेक प्रकारच्या गोळ्या डॉक्टर बाहेर घेण्यास सांगतात. औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होत असून, त्यांना औषधे विकत घ्यावी लागत आहेत. गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा व्यवस्थित मिळाव्यात आणि नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी सरकारने जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत. गोरगरिबांना कोणत्याही प्रकारे त्रासाला सामोरे जावे लागू नये, त्यांच्यावर व्यवस्थित उपचार व्हावे यासाठी आरोग्य विभागाकडून ४०० पेक्षा अधिक प्रकारच्या गोळ्या-औषधांचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरवला जातो.

मात्र, बीड तालुक्यातील नेकनुर येथील स्त्री रुग्णालय नेकनूर मध्ये अनेक प्रकारच्या गोळ्या-औषधे उपलब्ध नाहीत. काही दिवसांपासून या रुग्णालयामध्ये सुविधांचा बोजवाराही झाला आहे. एकतर डॉक्टरांची वेळेवर उपस्थित न राहणे त्यात औषधांचा तुटवडा यामुळे परिसरातील गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे. डॉक्टरांकडून औषधे लिहून दिली जातात; मात्र औषध देणारे कर्मचारी गोळ्या बाहेरून घ्या, असे सांगतात. येथे जखमेवरील औषधे, टीबी, बीपीवरील गोळ्याही उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे डॉक्टरांनी दहा गोळ्या लिहून दिल्या, तर कर्मचारी फक्त चारच देतात. अनेकदा औषध असूनही नसल्याचे कर्मचारी सांगतात.
सध्या औषध उपलब्ध नसल्याने बाहेरून औषधे विकत घ्या, असे स्त्री रुग्णालय नेकनुर येथील कर्मचारी रुग्णांना सांगत आहेत. रुग्णालयाचा भोंगळ कारभारामुळे मात्र रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. नर्सची पत्रकाराला सुद्धा अरेरावीची भाषा, रविवारी सकाळी 11 वाजता पत्रकार अभिजीत पवार नामक त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये गेले असता त्यांना सुद्धा तुम्ही सकाळी लवकर यायचे ना दहाच्या अगोदर आमच्या मागे आता खूप काम आहे. आता होणार नाही नंतर या अशा प्रकारचे नर्स ने पत्रकाराशी सुद्धा म्हटले आहे. नंतर डॉक्टरला फोन करून पत्रकाराने विचारले असता मी पत्रकार आहे असे म्हटल्यावर लगेच नर्सने दखल घेतली. जर पत्रकारांना अशा गोष्टींना सामोरे जावे लागते तर सामान्यांचे काय यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
उन्हाळा वाढत असल्याने वातावरणात बदल झाले आहेत. त्यामुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात गोरगरिबांचा समावेश आहे. परंतु या शासकीय आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांमध्ये नाराजी आहे. मोफत उपचार मिळावे म्हणून गोरगरीब जनता प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात; मात्र औषधे नसल्याने हजारो रुपयांचे औषध घेण्याचे प्रसंग गोरगरीब जनतेवर येत आहे. रविवार दिवशी गर्दी असल्यामुळे तेथील येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना बाहेरूनच औषधे घ्यावी लागत होती. नेकनूर मध्ये मोठी बाजारपेठ असल्यामुळे त्या ठिकाणी पंचक्रोशीतील नव्हे तर जिल्ह्यातील व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग त्या ठिकाणी आपली जनावरे विकण्यासाठी येत असतात. या दिवशी रुग्णालयामध्ये गर्दी निर्माण होते.
डॉक्टरांकडून औषधे लिहून दिली जातात; मात्र औषध देणारे कर्मचारी गोळ्या बाहेरून घ्या, असे सांगतात. येथे जखमेवरील औषधे, टीबी, बीपीवरील गोळ्याही उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे डॉक्टरांनी दहा गोळ्या लिहून दिल्या, तर कर्मचारी फक्त चारच देतात. अनेकदा औषध असूनही नसल्याचे कर्मचारी सांगतात.