पत्रकार नविद इनामदार आणि कुटुंबीयांवरील खोटे गुन्हे वापस घ्या – ऑल इंडिया पँथर सेना
- पत्रकार नविद इनामदार आणि कुटुंबीयांवरील खोटे गुन्हे वापस घ्या – ऑल इंडिया पँथर सेना
- 🔲 उपसंपादक-दिपक वाघमारे
- बीड प्रतिनिधी:- बीड येथील पत्रकार नविद इनामदार आणि कुटुंबीयांनी आपल्या वरील होत असलेल्या खोट्या गुन्ह्यांना कंटाळून पोलिस ठाणे पेठ बीड आणि शेख नाजीया यांच्या विरोधात मां पोलिस आयुक्त ,पोलिस अधीक्षक यांना एका निवेदनाद्वारे सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
- या बाबत ऑल इंडिया पँथर सेना आक्रमक झाली असून सामाजिक कार्यकर्ते आणि समाजासाठी झटणाऱ्या लढणाऱ्या लोकांवर होत असलेला हा अन्याय लोकशाहीत अन्यायकारक आहे.
- म्हणून त्यांच्यावरील खोटे गुन्हे विशेष तपास करून मागे घ्या चोर सोडून संन्याशाला फाशी नको विनाकारण नवीद इनामदार आणि कुटुंबीयांना आर्थिक सामाजिक त्रास नको म्हणून जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे संबंधित प्रकाराची चौकशी करून ते खोटे गुन्हे परत घ्या नसता ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऑल इंडिया पँथर सनेचे बीड जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे ,तालुका अध्यक्ष गणेश चक्रे,परमेश्वर निर्मळ ,शेख सद्दाम यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या एका निवेदनात दिलेला आहे.
error: Content is protected !!