32.4 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विले पार्ले चा जिम्नॅस्ट आध्यान देसाई याची भारतीय संघात निवड.!

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विले पार्ले चा जिम्नॅस्ट आध्यान देसाई याची भारतीय संघात निवड.!

मुंबईचे माजी महापौर माजी आमदार डाॅ. रमेश यशवंत प्रभू यांनी १९९७ साली प्रबोधकार ठाकरे क्रीडा संकुलाची स्थापना केली तेव्हा त्यांच्या मनात एक मोठे स्वप्न होते. त्यांना जागतिक दर्जाच्या आणि सर्वांसाठी खुल्या अशा पायाभूत सुविधा निर्माण करायच्या होत्या. गेल्या काही वर्षांमध्ये, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाने खेळाडूंसाठी जागतिक दर्जाचे इक्विपमेंटस् प्रदान केली आहे. यातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर आपल्या खेळात ठसा उमटवला आहे.

संकुलात खालील निरनिराळ्या क्रिडा प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण तज्ज्ञ प्रशिक्षकांडून दिले जात आहे. जलतरण, पिकलबॉल, मल्लखांब, बुद्धिबळ, ज्युडो, जिम्नॅस्टिक्स, कराटे, तायकोंडो, व्यायामशाळा, रोलर स्केटिंग, टेबल टेनिस, झुंबा, रायफल शुटिंग ईत्यादी. प्रबोधकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या ७ हून अधिक खेळाडूंनी विविध खेळांमध्ये सर्वात प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कार जिंकला आहे. मल्लखांब खेळातील अतुलनीय कामगिरीबद्दल श्री गणेश देवरूखकर यांना यावर्षी द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अगदी अलीकडेच, जिम्नॅस्टिक्स ॲथलीट आध्यान देसाईची आगामी ज्युनियर एशियन ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप २०२४ साठी हाँगकाँग, चीन येथे टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा मे महिन्यात होणार असून १० ते १२ मे २०२४ या कालावधीत होणार आहे. आध्यान हा माजी अंडर-१२ राष्ट्रीय चॅम्पियन देखील आहे आणि त्याने कोलकाता येथे नुकत्याच संपलेल्या सब ज्युनियर नॅशनल स्पर्धेत अनेक पदकेही जिंकली आहेत. हरियाणा येथील खेलो इंडियन युथ गेम्स २०२२ मध्येही त्याने भाग घेतला होता आणि सरकारी मंजूर योजनेअंतर्गत तो एक खेलो इंडिया ॲथलीट आहे. आध्यान गेल्या १० वर्षांपासून प्रबोधकार ठाकरे क्रीडा संकुल मध्ये सराव करत आहे. त्यांचे प्रशिक्षक श्री शुभम गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष श्री. अरविंद रमेश प्रभू आणि सचिव श्री मोहन अ. राणे यांच्या पाठिंब्याने ही अतुलनीय कामगिरी केली आहे. अध्यक्ष श्री. अरविंद रमेश प्रभू आणि सचिव मोहन अ. राणे यांनी ही बातमी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आणि आशियाई स्पर्धेसाठी आध्यानला शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!