मी सागर बंगल्यावर येतो, गोळ्या घाला, खोटे आरोप करू नका’,’मला सलाईनमधून विष देण्याची शक्यता’.!
- ‘मी सागर बंगल्यावर येतो, गोळ्या घाला, खोटे आरोप करू नका’,’मला सलाईनमधून विष देण्याची शक्यता’.!
- फडणवीस माझा एन्काऊंटर करू शकतात-मनोज जरांगे
- मराठा आंदोलक मनोज जरांगेंचे खळबळजनक आरोप..
- सराटी अंतरवली :- मराठा समाज संपवण्याचे काम सुरू आहे. मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय. देवेंद्र फडणवीस माझा एन्काऊंटर करण्याचा विचार करत आहेत, असे गंभीर स्वरुपाचे आरोप करत बैठक संपल्यावर सागर बंगल्यावर पायी येणार. संपवून दाखवा, असा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
- सराटी अंतरवलीत पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले. त्यांनी माझा बळी घ्या, पण माझ्यावर खोटे आरोप करू नका, मी सागर बंगल्यावर येतो, गोळ्या घाला, असं म्हणत देवेंद्र फडणविसांमुळेच अनेकांनी भाजप सोडली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना फोडण्याचे काम देवेंद्र फडणविसांनी केले. हे राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही तर देवेंद्र फडणवीस चालवत आहेत. फडणविसांना माझं उपोषण सोडवायला यायचं होतं, पण त्यांना येऊ दिले नाही तर अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे रद्द झाल्याने फडणविसांचा आपल्यावर राग असल्याचे जरांगे यांनी म्हटले. मला मारण्यासाठी सलाईनमधून विषाचा प्रयोग होऊ शकतो, म्हणून मी कालपासून सलाईन घेत नाही. मी फडणविसांना पुरून उरेल, असे म्हणत पाच महिने झाले तरी गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत. फडणविसांना माझा बळीच पाहिजे ना मी सागर बंगल्यावर येतो. जर मी रस्त्यात मेलो तर मला त्यांच्या दारात नेऊन टाका, असे म्हणत जरांगे यांनी बारस्कर यांना देवेंद्र फडणविसांनी बसवले आहे. मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सर्व देवेंद्र फडणवीस करत असून शिंदे आणि अजित पवार यांचे लोक यामध्ये सामील असल्याचेही त्यांनी म्हटले. मी टोकाचा निर्णय घेणार आहे. म्हणून नुसत्या टाळ्या अन् घोषणा नको, समाज कोणत्या दिशेने जातो, आपण कोणत्या दिशेला जात आहोत हे समजून घ्या. पुढे बोलताना जरांगे म्हणाले, जरांगेंबाबत काय घडले, काय षडयंत्र आहे हे मला समजून सांगायचे आहे, आता ही शेवटची घडी आहे, मी समाजाच्या नेत्यांना नेतृत्व म्हणून करतो, मी सामान्य घरातील शेतकर्यांचा मुलगा आहे, मी स्वार्थी, लबाड असतो तर इथून मागेच उघडा पडलो असतो. समाजाला नेता मिळाला नाही मिळाला हे समाजाने ठरवावे. कोणी तरी मराठ्यांना हरवण्याचे स्वप्न बघत आहे. छत्रपतींच्या समक्ष बसून सांगतो, मी कुठल्याच पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाचे काम करत नाही. मी उद्धव ठाकरे असताना सुद्धा त्यांना कडक शब्दात बोललो होतो. सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे, आपण ओबीसींमधून आरक्षण मागतो, जे मराठा आणि कुणबी एकच झाले असल्याचे सिद्ध झाले त्यांनीच सांगितले, सरसकट मिळत नाही. नारायण राणेंनी गेवराई, अंबडमधून काही लोक नेले, मला बदनाम करण्यासाठी गेवराई तालुक्यातून दोन आणि अंबड तालुक्यातून एक जण उचलून नेल्याचेही त्यांनी म्हटले. मी आता तुम्हाला सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
error: Content is protected !!