शंभूराज्याभिषेक सोहळ्यासाठी अतुलनाना माने पाटील यांना निमंत्रण.!
- शंभूराज्याभिषेक सोहळ्यासाठी अतुलनाना माने पाटील यांना निमंत्रण.!
- रायगडावर १६ जणांच्या हस्ते होणार सोहळा..
- माढा :– छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४३ वा राज्याभिषेक सोहळा दि. १६ रोजी रायगड येथे होणार आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या हस्ते राज्याभिषेक होणार आहे. यासाठी उंदरगाव ता माढा येथील ऊस उत्पादक शेतकरी नेते अतुलनाना माने पाटील यांना हा मान मिळाला आहे.
- छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समिती, रायगडच्या वतीने गेल्या नऊ वर्षांपासून हा सोहळा विविध संकल्पनेच्या माध्यमातून साजरा केला जातो. यावर्षी पोशिंदा राजा या संकल्पनेवर सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे.
- अतुलनाना माने पाटील ऊस शेती क्षेत्रात मोलाचे कृषी योगदान देणाऱ्या यंदाचा शेतकऱ्यांच्याहस्ते राज्याभिषेक होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील १६ जणांची यासाठी निवड झाली आहे. त्यांच्याहस्ते राज्यभिषेक होणार आहे. या शंभूराजे राज्यभिषेक सोहळा 16 जानेवारी 2024 रोजी कार्यक्रम चे यांना यासाठी निमंत्रण मिळाले आहे
error: Content is protected !!