32.4 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

व्यसनमुक्ती जनजागृती रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – डॉ. ज्योती विनायकराव मेटे

व्यसनमुक्ती जनजागृती रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – डॉ. ज्योती विनायकराव मेटे

बीड (प्रतिनिधी) थर्टी फर्स्टच्या नावाखाली डर्टी मुहूर्त साधत नवतरुण व्यसनाधीनतिकडे वळले जातात तरुणांनी व्यसनाधीनतेकडे न जाता सजग समाजासाठी निर्व्यसनी राहावे या उदात्त हेतूने लोकनेते स्व. विनायकराव मेटे यांनी गेल्या अनेक वर्षापासून ३१ डिसेंबर रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून युवकांनी दारू ऐवजी गरमागरम दुधासोबत नववर्षाचे स्वागत करावे ही संकल्पना अंमलात आणली त्यांच्या पश्चात सुरू केलेली व्यसनमुक्तीची चळवळ सुरू ठेवण्याचा निश्चय आम्ही केला आहे तेव्हा ३० डिसेंबर रोजी व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीमध्ये आणि ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी, तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी केले आहे.


लोकनेते स्व विनायकरावजी मेटे साहेब यांच्या प्रेरणेने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी व्यसनमुक्त बीड अभियान अंतर्गत व्यसनमुक्ती महारॅली व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बीड शहरात करण्यात येत आहे. या महारॅलीच्या उद्घाटन व समारोप कार्यक्रमास राज्यातील मंत्री महोदय व उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित असणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत जनजागृती रॅलीचे ३० डिसेंबर रोजी आयोजन केले आहे. हि रॅली सकाळी ०८.०० वा. श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणा पासुन आरंभ होईल. व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, नगर रोड, बीड येथे या रॅलीचा समारोप होईल. तर ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ०७.४५ ते १२.०० या दरम्यान लोकनेते स्व. विनायकरावजी मेटे साहेब यांच्या स्मरणार्थ लावणी भुलली अभंगाला हा ज्ञानेश्वर मेश्राम (झेंडा फेम) यांचा संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या दोन्ही कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. ज्योती मेटे यांनी केले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!