बीड – गेवराईत कृषी विभागाकडून दुकानांची तपासणी मोठं रॅकेट उघडकीस येणार ?
+++++++++++++++++++++++++++
बीड जिल्ह्यात बोगस खतांची विक्री करणारा मुख्य सुत्रधार कोण आहे याची चौकशी सुरू..
दि.27. सोमनाथ मोटे सह शाम जाधव
***********************************
गेवराई येथील मोंढ्यातील तीन ते चार कृषी सेवा केंद्राची तपासणी कृषी विभागाकडून करण्यात आली असल्याची माहिती आहे. सदरची तपासणी ही बोगस खत विक्री संदर्भात केली असल्याची माहिती सुत्रांकडून समजली आहे.जिल्हातील गेवराई आणि माजलगाव मधील राजेगाव येथील काही कृषी सेवा केंद्रामधुन बोगस खतांची विक्री केली असल्याने त्यासंबंधीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची देखील माहीती समजत आहे त्यामुळे गेवराई आणि राजेगावात बोगस खतांची तर विक्री झाली नसेल ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.सदरील दुकानांची तपासणी कृषी विभागाकडून जनार्दन भगत आणि अन्य लोकांनी केली असल्याचे समजते तर तपासणी नंतर काय प्रकार समोर येतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.