व्हिजेएनटी प्रवर्गातील बोगस घुसखोरीवर कारवाई करा- मनिषाताई पवार
पुणे जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन
बीड प्रतिनिधी – भटक्या विमुक्त जाती (अ) प्रवर्गामध्ये अनेक जातींचा समावेश आहे. याचा फायदा घेत सुवर्ण वर्गातील लोकांकडून बोगस जात वैधता प्रमाणपत्र काढत व्हिजेएनटी प्रवर्गाचा आरक्षणाचा लाभ घेत असल्याने खरे मुळ लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहेत. यामुळे व्हिजेएनटी प्रवर्गातील बोगस घुसखोरी करणार्या भामट्यांवर कडक शासन करत कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या व्हिजेएनटी विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा मनिषाताई पवार यांच्याकडून पुणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवत मागणी करण्यात आली आहे.
मागील काही वर्षांपासून आरक्षणाच्या घुसखोरी करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे मुळ खरे लाभार्थी आपल्या लाभापासून वंचित राहत आहेत. बोगस प्रमाणपत्र काढणार्यांकडून नौकरीतही लाभ घेत जात असल्याने भटक्या विमुक्त जाती व्हिजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. यामुळे हक्काच्या जागेत बोगस बाभटा लाभ घेत आहेत. तरी या बोगस बाभट्यांवर कठोर शासन करत कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर एसआयटी समिती स्थापन करत बोगस प्रमाणपत्र काढलेल्यांची चौकशी करण्यात यावी, विमुक्त जाती (अ) चे जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी रक्त नाते संंबंधी 2017 चा शासन निर्णय अधिसुचना रद्द करण्यात यावी, विमुक्त जाती प्रवर्गाला लागू असलेली नॉन क्रिमिलिअयरची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी मनिषाताई पवार यांच्याकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देतांना रिता जाधव, प्रियंका राठोड, कमल आडे, शिल्पा पवार, लता राठोड, सत्यभामा आडे, संदीप राठोड आदी उपस्थित होते