मोसंबी पिकातील फळ गळ व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन करून नियंत्रण करावे – डॉ गणेश मंडलिक
:बीड प्रतिनिधी – कृषी विज्ञान केंद्र खामगाव व कृषी विभाग गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी या मोहिमेतून दिनांक 25/08/2023 रोजी मौजे मादळमोही येथे श्री त्रिंबक मोहिते यांच्या मोसंबी बागे मध्ये उद्यानविद्या विषय विशेषज्ञ डॉ गणेश मंडलिक सर यांनी उपस्थित मोसंबी बागायतदार शेतकरी याना मोसंबी फळपिकाचे फळ गळ व कीड रोगांचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन कसे करावे व त्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बागेमध्ये स्वछता तसेच,आंतरमशागत, खताचे नियोजन, कीड व रोगांचे व्यवस्थापन,जैविक बुरशीनाशकांचा वापर,बायोमिक्स या जैविक खताचा वापर या बद्दल ही मार्गदर्शन करण्यात आले.या वेळी मंडळ कृषी अधिकारी मादलमोही श्री समाधान वाघमोडे,कृषी पर्यवेक्षक श्री व्ही डी जाधव,कृषी सहायक बी आर मोहोळकर, एम आय शेख,मार्गदर्शन साठी उपस्थित होते.तसेच या वेळी श्री त्रिंबक मोहिते,अंकुश झिंगरे,मोहन पवार,माऊली तळेकर,पंजाबराव हकदार,सुदाम भोपळे,मोमीनभाई,अशोक तळेकर,विष्णू मोहिते,दादाराव गोडसे,श्रीराम मोहिते,दीपक मोहिते,अहिलाजी मोहिते व मोसंबी बागायतदार शेतकरी उपस्थित होते.