पाऊसा अभावी झालेल्या नुकसानीचा सरसकट पंचनामा करावा म्हणून स्वराज्यपक्ष आक्रमक …
बीड प्रतिनिधी – आज स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य आडवोकेट विलास पवार यांच्या नेतृवात भूम उपविभागीय अधिकारी यांच्या कढे भूम वाशी तालुक्यातील मंडळांचा समावेश पावसाअभावी नुकसानीच्या पंचनाम्या मध्ये करावा अशी स्वराज्य पक्षाची मागणी निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आली.
भूम वं वाशी तालुक्या मध्ये पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके जळून खाक होत असताना सुद्धा जिल्हा सह नियंत्रण कमिटीच्या बैठकीमध्ये पिकाच्या नुकसानी संदर्भात पंचनाम्याच्या आदेशामध्ये मध्ये जिल्हाधिकारी व कमेंठीने भूम व वाशी तालुक्यातील मंडळांचा समावेश केलेला नाही. याचा खूप खेद वाटतो. भूम वाशी तालुक्यांमध्ये अक्षरशः पिक करपलेल्या अवस्थेत असताना सुद्धा भूम वाशी मधील मंडळांचा समावेश त्याच्यामध्ये का केला नाही तो लवकरात लवकर करावा म्हणजे माझ्या बळीराज्याला पीक विमा मिळेल.येणाऱ्या 25 तारखे पर्यंत पंचनामे नाहि झाल्यास स्वराज्य पक्षाच्या वतीने तिंव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा स्वराज्याचे वतीने देण्यात आला.
यावेळी स्वराज्य पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विलास पवार जिल्हासरचिटणीस निलेश वीर सर , जिल्हा प्रवक्ते प्रा. सागर गायकवाड सर, ता.प्रमुख गणेश नलवडे, ता.उपप्रमुख अरविंद हिवरे,ता.सचिव भाऊसाहेब प्रा.गणेश रेवडकर , यु .ता. प्रमुख अभिषेक कराळे, मिडीया प्रमुख सचिन माळी, अनिकेत आकरे, रुतुराज वीर , अभि सुरवसे,ओकार पवार, बाळासाहेब निर्फळ, धनाजी शिंदे ,समाधान पन्हाळे ,सचिन निर्फळ, जोतिराम पन्हाळे, अमोल तोरकड, सदाशिव गव्हाणे, सचिन खोबरे,व ईतर शेतकरी उपस्थित होते.