बीड जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र निर्माण करणे गरजेचे आहे – परमेश्वर मुंडे
बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात नविन औद्योगिक क्षेत्र निर्माण करणे गरजेचे असल्याचे पत्रकार परिषदेत राष्ट्रीय क्रांती सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर मुंडे यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे परमेश्वर मुंडे यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही मोठी कंपनी नाही. बीड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ठिकठिकाणी औद्योगिक क्षेत्र निर्माण करणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यात बेरोजगार तरुणांची मोठी संख्या वाढत चालली आहे. बीड जिल्ह्यात अंदाजे ४.५० ते ५ लाख लोक उस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर राज्यामध्ये स्थालांतरीत होतात. तसेच येथील बेरोजगारांना टेक्निकल कोर्स कुशल कारागीर आणि अकुशल कारागीर यांना पुणे, मुंबई, औरंगाबाद, सुरत, नाशिक, या ठिकाणी पोटाचा उदारनिर्वाह करण्यासाठी कामाला जातात. बीड जिल्ह्यात औरंगाबाद सारखी पंचतारांकीत औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्याची गरज आहे. प्रत्येक तालुक्यात औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यात यावे. प्रत्येक तालुक्यातील स्थानिक उद्योजकांना ५० % उद्योग निर्माण करण्यासाठी अनूदाण देण्यात यावे. ed बाहेरील येणाऱ्या उद्योजकांसाठी विज, जी. एस. टी., इनकम टॅक्स, टॅक्स फ्री व कमी दरात त्यांना औद्योगिक क्षेत्रातील जमिन उपलब्ध करून देण्यात यावी. कार्यामुळे मोठे उद्योजक बीड जिल्ह्यात उद्योग उभारण्यास आकर्षित होतील. स्थानिक उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी प्रशिक्षण फ्री मध्ये उपलब्ध करुण देण्यात यावे.यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी एक हजार कोटीचे पॅकेज देण्यात यावे.
टोटल जिल्ह्यासाठी अकरा हजार कोटीचे पॅकेज राज्य व केंद्र सरकारने द्यावे. वरिल मागण्यांचा सकारात्मक विचार करणे सरकारणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्ह्यातील वाढत चाललेली गुन्हेगारी, बेरोजगारी, मागासलेपणा, आत्महत्येच वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा हा पुर्णता शेतीवर अवलंबून असल्यामुळे येथे औद्योगिक क्षेत्र निर्माण केल्यास त्याचा मोठा फायदा शेतकरी व तरुण बेरोजगार टेक्निकल कुशल अकुशल कामगार स्थानिक उद्योजक यांना होणार आहे. अन्यथा या मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास जिल्ह्यात जन आंदोलन उभारण्यात येईल याची दखल प्रशासनाणे घ्यावी. दि. २१/०८/२०२३ रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात येतील. असे यावेळी परमेश्वर मुंडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.