श्री क्षेत्र चाकरवाडी मध्ये विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा…
- श्री क्षेत्र चाकरवाडी मध्ये विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा…
- बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय चाकरवाडी, बाळनाथ विद्यालय चाकरवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकरवाडी येथे 76 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय चाकरवाडी येथे भारताचा अभिमान तिरंगा राष्ट्रध्वज फडकून त्यास सलामी दिली. ग्रामपंचायत कार्यालय चाकरवाडी येथील ध्वजारोहण गावचे सरपंच विनोद कवडे यांनी केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलेल्या थोर महापुरुषांना अभिवादन सुद्धा यावेळी करण्यात आले.
- ग्रामपंचायत कार्यालय चाकरवाडी येथील ध्वजारोहण झाल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील ध्वजारोहण करण्यासाठी सर्व गावातील ग्रामस्थ गावचे भूमिपुत्र भारतीय सैनिक सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे उपस्थित राहिले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील ध्वजारोहण आदर्श पोलीस पाटील नानासाहेब काकडे यांच्या समवेत भारतीय सैनिक मनोज वाळके रजनीकांत घोडके संदीप मोरे यांनी केला. बाळनाथ विद्यालय चाकरवाडी येथील ध्वजारोहण भारतीय सैनिक कार्यरत असणारे मनोज वाळके यांनी केला. स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांनी राष्ट्रध्वजास सलामी देऊन महापुरुषांना स्वातंत्र्यदिनानिमित्त अभिवादन सुद्धा यावेळी केले. ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली तसेच आपल्या मनातून देशाविषयीचे प्रेम चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दाखविले. यावेळी चाकरवाडी चे सरपंच विनोद कवडे, पोलीस पाटील नानासाहेब काकडे, भारतीय सैनिक मनोज वाळके, संदीप मोरे, रजनीकांत घोडके, गणेश पवार, श्रीमंत मोरे, पत्रकार अभिजीत पवार, मोहन मोरे, गुलाब आनवणे, महादेव आनवणे, चत्रभुज पवार, उपसरपंच लखन अनवणे, निलेश मोरे, धम्मदीप वंजारे, राजेश कवडे, अक्षय घोडके, गोरख डोईफोडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर, बाळनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक जगताप सर, तसेच मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ, बाळनाथ विद्यालय चाकरवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकरवाडी येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त खाऊ वाटप करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. तसेच यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी गावचे भूमिपुत्र मनोज वाळके रजनीकांत घोडके आणि संदीप मोरे यांच्या हस्ते शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. शिलाफलकाचे अनावरण झाल्यानंतर भारतीय सैनिक मनोज वाळके रजनीकांत घोडके आणि संदीप मोरे यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
error: Content is protected !!