30.3 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

अनिलदादा जगताप यांच्या हस्ते कन्कालेश्वर विद्यालय येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप..!

अनिलदादा जगताप यांच्या हस्ते कन्कालेश्वर विद्यालय येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप..!

अण्णाभाऊ साठे याचं आयुष्य मानवतेचा संदेश देणारं- अनिलदादा जगताप
=================

♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे 

बीड : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जिल्ह्याभरात सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरी करण्यात आली. अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त जिल्ह्याभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.यापैकीच एक उपक्रम म्हणजे काल दि. 5 ऑगस्ट रोजी समाजसेवक राहुल चांदणे यांनी बीडमधील कन्कालेश्वर विद्यालय येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांना आमंत्रित केले होते. अनिलदादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कन्कालेश्वर विद्यालयामधील विद्यार्थ्यांना अनिलदादांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात आपल्या मनोगत भाषणात अनिलदादा जगताप यांनी अण्णाभाऊंचं आयुष्य आपल्याला मानवतेचा संदेश देणारं असल्याच्या भावना व्यक्त केल्या. भाग्यवंत आपण सारे की मानवजन्म नशीबी आला खरी मानवता जपली ज्याने मुखाचा घास भुकेल्यास दिला. या उद्देशाने समाजसेवक राहुल चांदणे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त गरजू आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवला आहे. हा उपक्रम स्तुत्य स्वरूपाचा असून खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंना आणि त्यांच्या विचारांना अभिवादन करणारा आहे. शिक्षणापासून कुणी वंचित राहू नये व हिरीरीने शिक्षण घेणाऱ्यांना एक आधाराचा, मदतीचा दिलेला हात अज्ञानाचा गरिबीचा नायनाट करणारा ठरतो असे विचार अनिलदादांनी यावेळी मांडले आणि राहुल चांदणे व त्यांच्या मित्रपरिवाराचे कौतुक करत त्यांना समाजकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी अनिलदादा जगताप यांच्यासह कन्कालेश्वर विद्यालयातील शिक्षकवृंद,विद्यार्थी तथा बीड शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————-

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!