11.6 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या वतिने गौंडरे येथील पी.एस.आय. सोनाली हनपुडे यांचा भव्य सत्कार…

धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या वतिने गौंडरे येथील पी.एस.आय. सोनाली हनपुडे यांचा भव्य सत्कार; अनेक मान्यवरांची उपस्थिती..

करमाळा प्रतिनिधी – गेल्या आठवड्यात झालेल्या MPSC परीक्षेत यश मिळवून पोलिस उपनिरीक्षक पदी मिळविलेल्या कु.सोनाली महादेव हनपुडे हिचा व करमाळा तालुक्यातील सरपडोह येथील PSI सागर पवार यांचा आदर सत्कार व सन्मान करण्यात आला. तसेच गौंडरे ग्रामस्थांच्या वतीने गावामधुन तिची भव्य मिरवणूक काडण्यात आली. अतिशय गरिब परिस्थिती मधुन आपले शिक्षण पुर्ण करुन तिने आपल्या गावचे व पालकांची व धर्मवीर संभाजी विद्या. गौंडरे या शाळेची अभिमानाने मान उंच केली आहे. यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या आईवडिलांचाही आदर सत्कार करण्यात आला.

या प्रशालेत शिक्षण घेऊन पोलिस पदी निवड झालेल्या कु.सुप्रीया तरटे. लक्ष्मण जगताप. सचिन जगताप. शहाजी चोपडे. सयाजी अंबारे. प्रिती हनपुडे व. महेश भोइटे. यांची रेल्वे मध्ये निवड झाली यांचा आदर सत्कार करण्यात आला. यावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक गणेश भाऊ करे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. व शाळेला दोन स्मार्ट टीव्ही देण्यात आल्या आपल्या विद्यालयामधुन आणखी असेच अधिकारी तयार होवो अशा भावना व्याक्त केल्या.

आपल्या कठीण परिस्थितीवर मात करत तिने आपले शिक्षण पुर्ण केले. आपल्या वडिलांसोबत तिने स्वतःता वेळप्रसंगी मजुरी करुन आपले शिक्षण पुर्ण केले आहे. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा गौंडरे येथे तर माध्यमिक शिक्षण धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे येथे झाले.

आज आपल्या विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक म्हणून धर्मवीर संभाजी विद्यालयाने तिचा भव्य दिव्य असा सत्कार समारंभ संपन्न झाला. या समारंभास करमाळा पोलिस ठाणे चे API जगदाळे साहेब हे प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे प्रा.गणेश भाऊ करे पाटील. हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तसेच उद्योगपती भारत शेठ आवताडे. व आग्री सेल्स आँफीसर बार्शीचे दिपक कवडे साहेब. सिना कोळेगाव धरण ग्रस्त संघटनेचे अध्यक्ष व मकाईचे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतिश बाप्पु निळ व संस्थेचे सचिव हरिदास काळे सर. शाळा व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष मेजर बाबासाहेब अंबारे व माजी सरपंच चंद्रकांत अंबारे. सुभाष नाना हनपूडे. पत्रकार माधव हनपुडे. महादेव धोंडे. राबूबाई तांबोळी . अशोक हनपूडे. दत्ता कापले. आदिनाथ सपकाळ. शकील तांबोळी. महादेव कदम. व शाळा समितीचे उपाध्यक्ष सौ.अश्विनी निळ. मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे शाळेच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी संगित विषारद विजय खंडागळे सर यांनी उत्क्रुष्ट संगित गायन करुन मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गिलबीले सर यांनी केले तर मुख्याद्यापक बापू निळ सर यांनी आपले विचार मांडले व कार्यक्रमाच्या शेवटी कोळेकर सर यांनी आभार मानले.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!