16.6 C
New York
Saturday, May 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

लोकनेते विनायकराव मेटे साहेबांचे सामर्थ्य नाशवंत नाही ; त्यांचे विचार तेवत ठेवू – डॉ. ज्योती विनायकराव मेटे

लोकनेते विनायकराव मेटे साहेबांचे सामर्थ्य नाशवंत नाही ; त्यांचे विचार तेवत ठेवू – डॉ. ज्योती विनायकराव मेटे

अभियानाला गावो-गावी उदंड प्रतिसाद 

बीड (प्रतिनिधी) लोकनेते विनायकराव मेटे यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी शिवसंग्राम कडून “जागर स्मृतीचा” अभियान दि. २२ जून पासून सुरू करण्यात आले आहे. या अभियानात डॉ. ज्योतीताई मेटे या गावो गावी जनतेशी संवाद साधत आहेत. काल ही त्यांनी विवध गावांना भेटी दिल्या यात नियोजित दौऱ्यात नसताना देखील वैतागवाडी येथील नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांनी या गावाला भेट देऊन गावकऱ्यांची संवाद साधला.

लोकनेते विनायकराव मेटे यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी या अभियानाच्या अनुषंगाने डॉ. ज्योती मेटे या जिल्ह्यातील गावांना भेटी देत जनतेशी संवाद साधत आहेत. सुरू असलेल्या या दौऱ्यास गावोगावी उदंड प्रतिसाद मिळत असून उपस्थित नागरिक मेटे साहेबांच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. काल डॉ. ज्योती मेटे यांच्या नियोजित दौरा सुरू असताना वैतागवाडी येथील ग्रामस्थांनी विनंती करत आमच्या गावाला भेट द्या अशी मागणी केली त्यांच्या विनंतीला मान देत डॉ.ज्योतीताई मेटे यांनी वैतागवाडी येथील गावकऱ्यांची संवाद साधला यावेळी आपल्या भाषणात बोलताना त्या म्हणाल्या की साहेबांनी आपल्या हायातीमध्ये समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत काम केले आहे. शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण भागातील तरुण यांच्यासाठी ते सामर्थ्य पणे लढले आहेत. त्यांचे हे सामर्थ्य नाशवंत नसून त्यांचे विचार आपल्याला पुढे तेवत ठेवायचे आहेत असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कोल्हारवाडी,आहेरवडगाव,पाली,मंझेरी,कोळवाडी,आंबिलवडगाव,कुंभारी,पोथरा,सात्रा,अंधापुरी घाट तांदळवाडीघाट सफेपूर, नेकनूर, मांजरसुंबा,या गावांना त्यांनी भेटी दिल्या याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष नारायण काशीद,बाळासाहेब खोसे, सुभाष जाधव, रायचंद कापसे, बाळासाहेब हावळे, विनोद कवडे,ऋषिकेश सुरवसे, मनीषा कुपकर,श्रीराम घोडके, शैलेश सुरवसे हे उपस्थीत होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!