डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांचा जिल्हा दौरा
लोकनेते विनायकराव मेटे यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी शिवसंग्राम कडून “जागर स्मृतीचा” अभियान
अभियानात शंभर पेक्षा जास्त गावांना भेटी
बीड (प्रतिनिधी) लोकनेते विनायकराव मेटे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिवसंग्रामच्या वतीने कला दी. २२ जून पासून “जागर स्मृतीचा” आभियान सुरू करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील शंभर पेक्षा जास्त गावांना डॉ. ज्योती विनायकराव मेटे या भेट देणार असून त्या थेट सर्व सामान्य लोकांशी संपर्क साधणार आहेत.
लोकनेते विनायकराव मेटे यांची जयंती दि. ३० रोजी साजरी करण्याचा संकल्प त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य मावळ्यांनी केला आहे. त्या त्या अनुषंगने जिल्ह्यातील ग्रामीण भागात २० ते २८ जून दरम्यान विविध समजिक उपक्रम आयोजित करत जयंती साजरी करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनतेचा संवाद व्हावा य हेतूने आणि स्व. विनायकराव मेटे साहेब यांनी त्यांच्या हयातीत केलेल्या कर्याना उजाळा देण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. याला काल श्री. क्षेत्र नारायण गड आणि नावगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेऊन डॉ. ज्योती मेटे यांनी सुरवात केली. पोंडूळ, खांबा लिंबा ,खालापुरी,जांब ,आर्वी, रायमोह , खोकरमोह, हटकरवाडी, मालकाचीवाडी, हिवरसिंगा या गावांना त्यांनी भेटी दिल्या अभियानाला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांची आणि विशेषतः महिलांची मोठी गर्दी होत आहे. या प्रसंगी शिवसंग्रामचे ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे, जिल्हाध्यक्ष नारायण काशीद, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,नवनाथ प्रभाळे, सुभाष जाधव, मा. प.स.सभापती मनीषा कोकाटे, मनीषा कुपकर, ज्ञानेश्वर कोकाटे, पंडित माने, साक्षीताई हांगे,साधना दातखीळ,संगीता ठोसर, शिवराम राऊत, माऊली शिंदे,विनोद कवडे, पांडुरंग अवरे,श्रीहरी दोडके(फौजी), ऍड. गणेश मोरे,गणेश साबळे,राजु येडे,अनिकेत देशपांडे,शैलेश सुरवसे,ज्ञानेश्वर डोरले,महादेव बहिर,प्रा.पंडित शेंडगे,गोकुळ शेंडगे ,आखिल भाई, राजेश घुंगरड,नवनाथ काशीद,अविनाश मारकड अन्य पदाधीकारी, कार्यकर्ते बहुसंखेने उपस्थीत होते.