ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड वडवणी शाखेच्या वतीने दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न….
गितांजली लव्हाळे वानखडे .वडवणी प्रतिनिधी:-
वडवणी येथील ज्ञानराधा बँक शाखेच्या वतीने वडवणी तालुक्यातील दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये विद्यालयातून गुण अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारी दि.१६जुन रोजी ज्ञानराधा बँकेत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब व वडवणी तालुका अध्यक्ष, तथा अँड. श्रीराम लंगे साहेब होते.तर प्रमुख पाहुणे अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य. महादेव अंडील सर अँड. चव्हाण सर, सर्जेराव महाजन आळणे, शिवप्रसाद माळवदे, सोनवणे सर, प्रा. श्रीमंत मुंडे, प्रशांत नहार, डॉ. धीरज नहार, बाळासाहेब मस्के ,गोंडे, चोले सर ,पत्रकार महेश सदरे , पत्रकार गितांजली लव्हाळे,बी.डी आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेमध्ये विद्यालयातून प्रथम ,द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा पालकासह मान्यवरांच्या शुभहस्ते गणपती प्रतिमा पेन स्मृतिचिन्ह बुके ,शाल देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्राचार्य. महादेव अंडील सर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की आजच युग हे स्पर्धेचे युग आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले .आणि कौतुक केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. श्रीराम लंगे सर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की अथक प्रयत्न केल्याशिवाय यश शक्य होत नाही. त्यामुळे आपण जिद्द मेहनत ,चिकाटीने अभ्यास करा. आई वडिलांचे स्वप्न साकार करा. व डॉक्टर ,इंजिनिअर ,कलेक्टर ,आणि चांगला माणूस बना. आणि तुमचा सत्कार करण्याची संधी आम्हाला द्या. असे विचार व्यक्त करून गुणवत्ता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक बँकेचे मॅनेजर मा. श्री. वाय .आर शिंदे साहेब यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीमंत मुंडे सर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार साईनाथ पोकळे सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी शिक्षक प्रेमी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.