जिवन पुष्प व तथागत सार्वजनिक वाचनालय येळंब घाट तर्फे वृक्षारोपण सोहळा संपन्न..!
♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
बीड : जिवनपुष्प व तथागत यांच्या वतीने दरसाला प्रमाने यावर्षी देखील बीड तालुक्यातील येेळंंब (घाट)येथील जिवनपुष्प व तथागत यांच्या तर्फे भव्य वृक्षारोपण सोहळ्यामध्ये असंख्य विविध झाडांची रोपे लावण्यात आली. जिवनपुष्पचे मार्गदर्शक वंजारे जयदिप (आण्णा) यांच्या नेतृत्वाखाली येळंब (घाट) येथील युवक व तुळजाई ॲग्रोचे मालक गायकवाड, पपेशजी जाधव, पायाळ ॲड .वीर साहेब सामाजिक क्षेत्रात उल्लेखनी कार्य करणारे सतीशजी पायाळ,कैलास पायाळ,गौतम सर,जिवन पुष्प व तथागतचे सर्व सदस्य यांनी 80 ते 90 हजार झाडे लावण्याचा संकल्प करत तो पुर्ण करत आहेत.
विशेष कार्यक्रमात तथागत वाचनालयाचे संस्थापक जयदिप आण्णा वंजारे व त्यांचे सहकारी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत सर्वांनी झाडे लावण्यात मदत केली,यावेळी उपस्थित आसलेले सहकारी सतीश वंजारे स्वस्तिक हार्डवेअर मालक प्रतीक कदम, बाळासाहेब पंडीत, आविनाश वंजारे आदी सदस्य तथा नवोदय वि. चे भगवान सर यांनी झाडांना पाणी देण्यासाठी मदत केली यावेळी पदाधिकारी मोठया संख्यने उपस्थीत होते .