24.2 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले शेतकरी सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे- जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचे अवाहन..!

  • बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले शेतकरी सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे- जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचे अवाहन..!
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
  • बीड दि,५ : बीड जिल्हयातील आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील नैराश्याने ग्रासलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांचे मनोबल उंचावणे / अशा शेतक- याच्या कुटुंबांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे व त्यांना शासकीय योजनांचा प्रधान्याने लाभ देणे अत्यावश्यक आहे. त्यानुषंगाने शेतक-यांची आर्थिक, सामाजिक व कौटुंबीक सुरक्षितेबाबतची पाहणी करुन कुटुंबाच्या सदयस्थितीचा आढावा घेवुन त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचा एक भाग म्हणून शेतक-याच्या घरी प्रत्यक्ष भेट देवून कुटुंबीयांशी चर्चा करुन त्यांच्या सदयस्थितीबाबतची माहिती घेण्यासाठी बीड जिल्हातील तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, कृषी सहाय्यक तसेच शिक्षक ( संमतीने) यांचे माध्यमातून शेतकऱ्यांचे सर्वेक्षण सुरु आहे.
  • बीड जिल्हयातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, आपण तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, कृषी सहाय्यक यांचेमार्फतच शेतकरी सर्वेक्षणचा पाहणी विवरणपत्र ऑफलाईन / अॅपद्वारे निःशुल्क भरणा करुन घ्यावे. त्यामुळे शेतकर्यांनी कोणत्याही खाजगी व्यक्ती किंवा खाजगी इंटरनेट कॅफेवर शेतकरी सर्वेक्षणाचे विवरणपत्र पैसे देवून भरुन घेवू नये असे श्री. संतोष राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांनी अवाहन केले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!