24.2 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

गेवराईत माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त डे-नाईट साहेब चषक कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ..

गेवराईत माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त डे-नाईट साहेब चषक कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ..

कब्बडी स्पर्धात महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांतून पन्नास संघाने सहभागी झाले 

================

गेवराई दि.४ (प्रतिनिधी) सोमनाथ मोटे सह शाम जाधव 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनचे उपाध्यक्ष अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंबा आय.टी. आय., गेवराई येथील शारदा कबड्डी अकॅडमी मैदानावर ६० किलो वजनी गटामध्ये डे-नाईट म साहेब चषक कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ युवानेते पृथ्वीराज पंडित आणि रणविर पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यवेळीबाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, किसान सेलचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

रा.कॉ. पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा म.रा. कबड्डी असोशिएशनचे उपाध्यक्ष अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार यांच्या माध्यमातुन गेवराई येथील शारदा अकॅडमीच्या मैदानावर ६० किलो वजनी गटाच्या डे-नाईट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन युवानेते पृथ्वीराज पंडित आणि शारदा ॲकाडमीचे संचालक रणविर पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी उद्घाटनचा सामना शारदा प्रतिष्ठान विरुद्ध मिडलाईन मुंबई या दोन संघामध्ये झाला.

यावेळी माजी नगराध्यक्ष शेख खाजाभाई, माजी नगरसेवरक शाम येवले, गोरख शिंदे, रा.का. शहराध्यक्ष दिपक आतकरे, सरवर पठाण, सरपंच सचिन ढाकणे, प्रा. राजेंद्र बरकसे, सतिष दातखीळ, शेख मोहसिन, भाऊसाहेब माखले, नविद मशायक, अमोल वैद्य, सखाराम शिंदे, प्रदिप जोशी, दत्ता लाड आदी उपस्थित होते. सदरील स्पर्धेसाठी पंच म्हणुन डॉ. भागचंद सानप, शिवाजी वाबळे, प्रताप शेंडगे, अमोल तांदळे, प्रा. भिमा माने, अनिल जगदाळे, कैलास जगदाळे आदी काम पहात आहेत. या स्पर्धेमध्ये जवळपास २५ संघांनी सहभाग नोंदवला आहे.

यावेळी वैभव गर्जे यांची भारतीय सैन्य दलात तर हनुमान गर्जे यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल पृथ्वीराज पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डे-नाईट सुरु असलेल्या कबड्डी स्पर्धेसाठी क्रिडाप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. केतन गायकवाड, प्रा. राजेंद्र बरकसे, जयसिंग माने, अमित वैद्य, जिनव साळवे, अभिषेक फुलारे, सिद्धू धांडे, निखील गोरे, विशाल व्हनमाने, भागवत दहिवाळ, शुभम टाक आदी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेंद्र बरकसे यांनी केले. सुपत्रसंचलन सुधिर गाडे यांनी तर आभार नगरसेवक शामकाका येवले यांनी मानले.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!