16 C
New York
Tuesday, October 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

अप्रतिम वक्ते म्हणजे माझे ज्ञानोबा राय आहेत – अर्जुन महाराज लाड गुरुजी

अप्रतिम वक्ते म्हणजे माझे ज्ञानोबा राय आहेत – अर्जुन महाराज लाड गुरुजी

बीड प्रतिनिधी – विसाव्या शतकातील एक महान संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या तेविसाव्या पुण्यतिथी निमित्त ह. भ. प महादेव महाराज तात्या, ह. भ. प नारायण महाराज भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली चालु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पाचव्या दिवसाची किर्तन सेवा ह. भ. प अर्जुन महाराज लाड गुरुजी यांची गोड सेवा संपन्न झाली. महाराजांनी आपल्या वाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध केले.

अप्रतिम वक्ते म्हणजे ज्ञानोबा राय आहेत असे महाराजांनी आपल्या वाणीतून भाविकांना सांगितले, तुकाराम महाराज संसार च्या लांब असल्यामुळे तो आणि परमार्थ च्या जवळ असल्यामुळे हा, हे महाराजांनी व्याकरणामधून परमार्थ भाविकांना सांगितला. संसार आणि परमार्थ एक आहे. कदाचित एक आहे. फक्त संतासाठी संसार आणि परमार्थ एक आहेत. सर्वत्र नाही अस सुद्धा अतिशय सुश्राव्य असं कीर्तन करून समाज जागृती केली. माणसाला मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर माणसाने समाजातील सर्व लोकांची कामे करून, आपुलकीने वागून समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले पाहिजे.

ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजी यांनी प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा सर्व परिचित असणारा अभंग

तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना, कृपादान केले संती, कल्पांती हे सरेना, तुका म्हणे संत सेवा, हेचि देवा उत्तम.

या अभंगावरती ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजी यांनी समाजामधील चालीरीती, अनिष्ट परंपरा यावर घणाघात करून अध्यात्मातील अनेक उदाहरणे देऊन उपस्थित श्रोत्यांना कधी व्याकरणामधून डोळ्यांमध्ये अश्रू तर कधी ओठांवर हसू आणलेले होते.

यावेळी उपस्थित महाराष्ट्र ज्यांना मृदुंग महामेरू म्हणुन ओळखतो असे राम महाराज काजळे भाऊ, अभिमान महाराज ढाकणे, नाना महाराज कदम, अच्चुत महाराज घोडके, दिनेश महाराज काळे, पांडुरंग महाराज शिंदे, पिसे महाराज, राम महाराज गायकवाड, बिभिशेन महाराज कोकाटे, माऊली महाराज औटे, संजय महाराज देवकर, अमोल महाराज पवार तसेच आदर्श पोलिस पाटील नानासाहेब काकडे, सरपंच विनोद कवडे, पत्रकार अभिजीत पवार, मिथुन पवार, मांचिक पवार, माजी सरपंच चत्रभूज पवार, परमेश्वर भोसले सर पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!