वडवणीत प्रथमच होणाऱ्या प्रा. गणेश शिंदे सर यांच्या व्याख्यानाला उपस्थित रहा..!
उपसंपादक -गितांजली लव्हाळे वानखडे
वडवणी : वडवणीच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये नामांकित असणाऱ्या चौंडेश्वरी कोचिंग क्लासेस आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व भव्य विद्यार्थी पालक मेळावा दिनांक 3 जून रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीराम मंदिर चौक वडवणी या ठिकाणी आयोजित केलेला आहे.
तरी या गुणगौरव सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते गणेश जी शिंदे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वडवणी नगरीचे नगराध्यक्ष शेषरावजी जगताप यांची उपस्थिती लाभणार आहे व बीडच्या गालिब फिजिक्स क्लासेसचे प्रशांत खाटोकर सर व विद्याप्रबोधनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सत्यप्रेम मगर सर यांचे देखील विशेष मार्गदर्शन लाभणार आहे, तसेच उपनगराध्यक्ष बन्सीधरराव मुंडे, माजी नगराध्यक्ष बाबरी शेठ मुंडे, वडवणी पोलीस स्टेशनचे एपीआय आनंदजी कांगुने साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव आळणे, नगरसेवक सुधीर भाऊ ढोले, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथराव म्हेत्रे, नगरसेवक नागेश डीगे, नगरसेवक हरिदास टकले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे,तरी वडवणी तसेच वडवणी परिसरातील सर्व विद्यार्थी पालक यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आव्हान क्लासचे संचालक सुरज टोम्पे सर आणि तुकाराम दिवटे सर यांनी केले आहे.